मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange Patil : भुजबळांच्या टीकेनंतर जरांगेंचं खुलं आव्हान, म्हणाले “…तर मी जिवंत समाधी घेईन”

Manoj Jarange Patil : भुजबळांच्या टीकेनंतर जरांगेंचं खुलं आव्हान, म्हणाले “…तर मी जिवंत समाधी घेईन”

Dec 17, 2023, 11:33 PM IST

  • Manoj Jarange on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी जाहीर सभेत जरांगेंचा उल्लेख बेवडा असा केला होता. यावर जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Manoj Jarange on Chhagan Bhujbal

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी जाहीर सभेत जरांगेंचा उल्लेख बेवडा असा केला होता. यावर जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

  • Manoj Jarange on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी जाहीर सभेत जरांगेंचा उल्लेख बेवडा असा केला होता. यावर जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भिंवडी येथील ओबीसी मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका करताना त्यांना बेवडा संबोधले. भुजबळ म्हणाले की, आधीच मर्कट त्यात मद्य प्याले. जरांगे मला पाहून घेण्याची भाषा करतो, पण आधी स्वत:ची तब्येत सांभाळा. दारू पिऊन किडन्या खराब झाल्या आहेत. या टीकेनंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पलटवार केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

जरांगे पाटील म्हणाले की, त्यामुळे मी त्याला (भुजबळ) येटपट म्हणतो. मला सासऱ्याच्या घरचं खातो म्हणतो पण तो येवल्यात सासूच्या घरचं खातो. माकड काय करू शकतं? ते जरा रावणाला विचार. तुझी लंकाही जळेल, जरा नीट राहा.

मी त्याला जाहीर आव्हान करतो की, माझी नार्को टेस्ट करा. जन्मापासून आतापर्यंत माझ्या शरीराला दारुचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेतो अन्यथा  भुजबळांनी जिवंत समाधी घ्यावी, हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे. तू काहीही बोलू नको, मापात राहा, असं खुलं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलं आहे.

जरांगे पाटील भुजबळांना उद्देशून म्हणाले की,तो प्रचंड जातीवादी आहे. तो महामूर्ख माणूस आहे. त्यामुळेच मी त्याला येडपट म्हणतो. माझ्या शरीराला जन्मापासून दारुचास्पर्श नाही. हे शरीर जनतेसाठी लढून झिजलं आहे. तुझ्यासारखं लोकांचं रक्त पिऊन फुगलं नाही.

काय म्हणाले होते भुजबळ?

भिवंडीतील मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, जरांगे काहीही बोलतो, मला म्हणतो येवल्याचा येटपट. ओबीसींचं आरक्षण म्हणे एकटा भुजबळ खातो, अरे ते खायला काय लाडू पेढा आहे का? तू खातोय ना सासरच्या घरी भाकरीमग खा.

आमची लायकी काढतो. आमची लायकी काढणारी तु कोण. एक म्हण आहे. आधीच मर्कट आणि त्याच्यात मद्य प्याला, अशी घणाघाती टीका भुजबळांनी केली.

जरांगे मला पाहून घेण्याची धमकी देतात, आधी तुमची तब्येत सांभाळा. तुमची दारू पिऊन-पिऊन किडनी खराब झाली. दादागिरीची भाषा सहन केली जाणार नाही.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या