मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : फीसाठी पैसे नाही, मराठा आरक्षणही मिळत नाही, असं लिहत, नांदेडमध्ये दहावीतील मुलाने संपवलं जीवन

Maratha Reservation : फीसाठी पैसे नाही, मराठा आरक्षणही मिळत नाही, असं लिहत, नांदेडमध्ये दहावीतील मुलाने संपवलं जीवन

Oct 23, 2023, 08:07 AM IST

    • Boy ended his life for Maratha Reservation : नांदेडमध्ये मराठा अरक्षणासाठी आणखी एका मुलाने आपले जीवन संपवले आहे. फी भरण्यासाठी पैसे नाही तसेच आरक्षण देखील नाही असे लिहून या मुलाने आपले जीवन संपवले.
Boy ended his life for Maratha Reservation

Boy ended his life for Maratha Reservation : नांदेडमध्ये मराठा अरक्षणासाठी आणखी एका मुलाने आपले जीवन संपवले आहे. फी भरण्यासाठी पैसे नाही तसेच आरक्षण देखील नाही असे लिहून या मुलाने आपले जीवन संपवले.

    • Boy ended his life for Maratha Reservation : नांदेडमध्ये मराठा अरक्षणासाठी आणखी एका मुलाने आपले जीवन संपवले आहे. फी भरण्यासाठी पैसे नाही तसेच आरक्षण देखील नाही असे लिहून या मुलाने आपले जीवन संपवले.

नांदेड: राज्यात मराठा आरक्षणावरून राण पेटले आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, नांदेड येथे मराठा आरक्षणासाठी एका युवकाने आपले जीवन संपवल्याची घटना ताजी असतांना मराठा अरक्षणासाठी एका १० वी तील मुलाने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे . नायगाव तालुक्यातील भोपळा येथील एका १७ वर्षीय मुलाने विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली. त्याने मृत्यूपूर्वी शिक्षणासाठी फी भरण्याची ऐपत नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याची चिट्ठी देखील सापडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Maharashtra Weather Update: राज्यात कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे ढगाळ हवामान; थंडीची चाहूल लागणार, वाचा हवामानाचा अंदाज

ओमकार बावणे (वय १७) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान, नांदेड येथे हदगाव तालुक्यातील वडगाव तेथील शुभम पवार (वय २४) याने विष पिऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतांना ओमकार बावणे या मुलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री शुभमच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.

Ajit Pawar On Maratha Reservation : बारामतीमध्ये आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील भोपळा येथे ओमकार राहत असून त्याचे आई वडील मोलमजुरी करतात. घरची परिस्थिती बेटाची असल्याने तसेच आरक्षण मिळत नसल्याने ओमकार बावने याने विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने विहिरीवर चिठ्ठी लिहून ठेवली होती. माझे आई वडील मोल मजुरी करून आम्हाला शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला पाहवत नव्हती. या सोबतच मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून आत्महत्या करत आहे, असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.

या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओमकारचा मृतदेह नायागव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या दोन आत्महत्यांमुळे आज नांदेड जिल्हात मराठा आरक्षण आंदोलन चिघळण्याची शक्यता असल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या