मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange: ‘तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे, एकदा आरक्षण मिळू दे..’, जरांगेंची भुजबळांवर जहरी टीका

Manoj Jarange: ‘तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे, एकदा आरक्षण मिळू दे..’, जरांगेंची भुजबळांवर जहरी टीका

Dec 23, 2023, 06:53 PM IST

  • Manoj Jarange Criticized Chhagan Bhujbal : जरांगे पाटील भुजबळांवर टीका करताना म्हणाले की, याच्या डोक्यात गटारासारखे किडे भरलेत, याची नियत मराठ्यांना आधी समजली असती तर याला इतकं मोठं केलंच नसतं.

Manoj Jarange Criticized Chhagan Bhujbal

Manoj Jarange Criticized Chhagan Bhujbal : जरांगे पाटील भुजबळांवर टीका करताना म्हणाले की, याच्या डोक्यात गटारासारखे किडे भरलेत, याची नियत मराठ्यांना आधी समजली असती तर याला इतकं मोठं केलंच नसतं.

  • Manoj Jarange Criticized Chhagan Bhujbal : जरांगे पाटील भुजबळांवर टीका करताना म्हणाले की, याच्या डोक्यात गटारासारखे किडे भरलेत, याची नियत मराठ्यांना आधी समजली असती तर याला इतकं मोठं केलंच नसतं.

बीडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची ‘इशारा सभा’ पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ‘येवल्याचा येडपट’ म्हणत हल्लाबोल केला. सभेपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेतही जरांगे यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत जहरी टीका केली. मराठ्यांना वाटलेलं तू खूप चांगल्या विचारांचा आहेस. पण तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

जरांगे म्हणाले की, भुजबळांची नियत मराठ्यांना आधी समजली नव्हती. इतक्या खालच्या विचाराचा असल्याचं समजलं असतं तर तुला इतकं मोठं केलंच नसतं. मराठ्यांना वाटलेलं तू खूप चांगल्या विचारांचा आहेस. पण तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत. हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हतं. मराठ्यांनी तुला चांगलं समजून मोठं केलं मात्र आता लोकांना तुझी नियत समजली आहे.

जरांगे भुजबळांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले की, एकदा आरक्षण मिळूदे तुला हिसकाच दाखवतो. खूप दिवस झालं तुझी फडफड चालू आहे. कुणी म्हणतं हॉटेल जाळलं, घरे जाळली. पण, शांततेत असलेल्या मराठ्यांवर खोटा डाग लावला गेला. त्यांनी स्वत:चीच हॉटेल जाळली अन् मराठा तरूणांना अडकवण्याचे काम केलं. मात्र, मराठ्यांना शांतता हवी आहे.

 

भुजबळांना उद्देशून जरांगे म्हणाले, येडपट बुजगावणं, माझी शाळा काढतंय, याला मंत्री कुणी केलं. डबडा कुठला..  एकदा मराठा आरक्षण मिळू दे मग याला दाखवतो. आम्ही गप्प बसलो की काड्या करतोय. जर माझ्या मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर सुट्टी नाही,असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

पुढील बातम्या