मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jaipur express : डब्यात मृतदेह पडले होते; आरपीएफ जवान रिव्हॉल्व्हर घेऊन गाडीत फिरत होता, प्रत्यक्षदर्शीने सांगितली घटना

Jaipur express : डब्यात मृतदेह पडले होते; आरपीएफ जवान रिव्हॉल्व्हर घेऊन गाडीत फिरत होता, प्रत्यक्षदर्शीने सांगितली घटना

Jul 31, 2023, 11:40 AM IST

    • Jaipur Express Firing : पालघर येथे एका आरपीएफ हवालदाराने जयपूर एक्सप्रेसमध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास गोळीबार केला असून यात चार जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
Jaipur Express Firing (HT)

Jaipur Express Firing : पालघर येथे एका आरपीएफ हवालदाराने जयपूर एक्सप्रेसमध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास गोळीबार केला असून यात चार जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

    • Jaipur Express Firing : पालघर येथे एका आरपीएफ हवालदाराने जयपूर एक्सप्रेसमध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास गोळीबार केला असून यात चार जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई : सकाळचे ५ वाजले होते आणि जयपूर-मुंबई एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने वेगाने जात होती. दरम्यान, आरपीएफ जवान चेतन सिंह आणि त्याचा वरिष्ठ अधिकारी सहायक पोलीस निरीक्षका सोबत भांडण झाले. यातुन जवानाने त्याच्या जवळील पिस्तुलातून गोळीबार केला. यात सहायक पोलीस निरीक्षक टीका राम आणि तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जयपूर एक्सप्रेसच्या बी-५ कोचमध्ये या चौघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होते आणि आरोपी जवान हा गाडीतून फिरत होता. यावेळी त्याने गाडीची चेन ओढली आणि पळून गेला.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये आज सकाळी झालेल्या गोलिबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गाडीत बसलेल्या प्रवाशांनी गाडीत घडलेला घटनाक्रम सांगितला. या घटनेत टिकाराम मीणा (एएसआय, आरपीएफ), अब्दुल कादर मोहम्मदहुसेन (वय ५० भानपुरावाला, रा. नालासोपारा, अख्तर अब्बास अली (वय ४८, रा. शिवडी) अशी मृतांची नावे आहेत.

Pune terrorist arrest : पुण्यातील ते दहशतवादी कोल्हापूरला करणार होते लक्ष; एटीएसने दिली माहिती, रेकी केलेला ड्रोन जप्त

जयपुरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेसमध्ये (१२९५६) सोमवारी पहाटे आरपीएफ जवान चेतन सिंह आणि एपीआय टीका राम हे सोबत प्रवास करत होत. दरम्यान, त्यांच्यात वाद झाला. यावेळी आजूबाजू असलेल्या नागरिकांनी आणि टीका रम यांनी चेतन सिंह याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्याच्या जवळील पिस्तुलातून टीका राम आणि अन्य प्रवाशांवर गोळीबार केला. यात चौघांचा मृत्यू झाला. या नंतर चारही जणांचे मृतदेह गाडीत रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. आरोपी हा गाडीत फिरत होता. यानंतर चेतन सिंह याने दहिसर येथे गाडीची चैन ओढून ट्रेनमधून बाहेर उडी टाकत पळ काढला. मात्र, चेतन सिंह याला रिव्हॉल्वरसह ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली.

Jaipur Express Firing : मोठी बातमी ! पालघर येथे जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF हवालदारचा गोळीबार; चार प्रवसी ठार

चेतन सिंह याची गुजरातहून मुंबईत बदली झाली होती. त्यामुळे तो नाराज होता. दरम्यान, त्याचा वरिष्ठांशी काही वाद झाला, त्यानंतर त्याने चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार केला. यामध्ये टिका राम आणि शेजारील सीटवरील आणखी तीन प्रवासी ठार झाले. आरोपी हा गडीची चैन ओढून फरार झाला होता.

या घटनेनंतर ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकावर आणण्यात आली, जिथे रेल्वे पोलिसांनी बी-5 कोचचा ताबा घेतला आणि घटनेचा तपास सुरू केला. ट्रेनचे एसी कोच अटेंडंट कृष्ण कुमार शुक्ला यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. प्रसारमाध्यमांशी बोलताना शुक्ला यांनी सांगितले की, सकाळचे पाच वाजले होते. तेवढ्यात त्याला बोगीत गोळीबाराचा आवाज आला. तो म्हणाला की मी एसी कोचकडे धाव घेतली तेव्हा मला खाली जमिनीवर मृतदेह पडलेले दिसले. आरोपी हवालदार चेतन सिंग हातात रिव्हॉल्व्हर घेऊन बोगीतून फिरत होता. गोळी लागल्याने एएसआय टिका राम खाली पडले होते. यावेळी चेतन सिंगने काही प्रवाशांवरही गोळी झाडली.

या घटनेने बोगीत उपस्थित असलेले इतर प्रवासीही घाबरले असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. सध्या जीआरपीच्या जवानांनी चेतन सिंगला अटक केली आहे. चारही मृतदेह कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. शुक्ला यांनी सांगितले की, हत्याकांडानंतर चेतन सिंगने दहिसर रेल्वे स्थानकाजवळ साखळी ओढली आणि नंतर संधी पाहून पळून गेला. त्याला भाईंदर येथून रेल्वे पोलिसांनी पकडले आहे. चेतन सिंगने झाडलेल्या गोळीच्या खुणा बोगीच्या खिडक्यांच्या काचेवरही दिसत होत्या.

पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई) नीरज कुमार यांच्या माहितीनुसार, "सकाळी सहाच्या सुमारास आम्हाला समजलं की एस्कॉर्टिंग ड्युटीवर तैनात असलेल्या एका आरपीएफ हवालदाराने गोळीबार केला. गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला, आमचे रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क केला असून त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल."

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या