मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Road Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चुलता-चुलतीसह पुतण्याचा जागीच मृत्यू

Road Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चुलता-चुलतीसह पुतण्याचा जागीच मृत्यू

Mar 07, 2023, 06:46 PM IST

  • Samruddhi Mahamarg Road Accident: समृद्धीवर महामार्गावर सोमवारी रात्री घडलेल्या अपघातात पती-पत्नीसह पुतण्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Road Accident (HT)

Samruddhi Mahamarg Road Accident: समृद्धीवर महामार्गावर सोमवारी रात्री घडलेल्या अपघातात पती-पत्नीसह पुतण्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

  • Samruddhi Mahamarg Road Accident: समृद्धीवर महामार्गावर सोमवारी रात्री घडलेल्या अपघातात पती-पत्नीसह पुतण्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Accident: समृद्धी महामार्गावर सोमवारी (6 मार्च २०२३) रात्री कार आणि मालवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चुलता-चुलतीसह पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल किसन राठोड (वय,३५), भाग्यश्री अनिल राठोड (वय, ३२) रोहित सुनील राठोड (वय, १२) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. अनिल राठोड हे सोमवारी रात्री पत्नी, पुतण्या आणि दोन मुलांसह शिर्डी येथून समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी कारने निघाले होते. परंतु, वैजापूरला आल्यानंतर मालवाहू ट्रक आणि राठोड यांच्या कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होते की, अनिल त्यांची पत्नी भाग्यश्री आणि त्यांचा पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सुदैवाने कारच्या मागील सीटवर बसलेले दोन चिमुकले सुखरूप असून दोघेही थोडक्यात बचावले.

याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली. अपघात कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच एकाच कुटुंबियातील तीन व्यक्तीचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

बीड: सासऱ्याच्या अंत्यविधीला जाताना जावायाचा दुर्देवी मृत्यू

बीडच्या आष्टी तालुक्यात आज सकाळी धक्कादायक घटना घडली. चुलत सासऱ्याच्या अंत्यविधीला जाताना कार २०० खोल दरीत कोसळल्याने जावायाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना महादेवदरा घाटात सोमवारी (६ मार्च २०२३) सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या