मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC करणाऱ्यांनो ही बातमी वाचा! आता 'या' परीक्षा घेतल्या जाणार केवळ ऑफलाइन पद्धतीने

MPSC करणाऱ्यांनो ही बातमी वाचा! आता 'या' परीक्षा घेतल्या जाणार केवळ ऑफलाइन पद्धतीने

Sep 15, 2023, 07:37 AM IST

    • MPSC new Exam rule: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या दोन परीक्षा आता ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
MPSC new Exam rule

MPSC new Exam rule: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या दोन परीक्षा आता ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

    • MPSC new Exam rule: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या दोन परीक्षा आता ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

पुणे : राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. या तरूणांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षे संदर्भात एक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या दोन परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेतल्या जात होत्या. मात्र, यात या परीक्षा पूर्वी प्रमाणे ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा थरकाप उडवणारा video व्हायरल, पाहा!

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Weather Update: राज्यात तीन दिवस संततधार! विदर्भ मराठवाड्याला यलो अलर्ट, पुणे मुंबईतही बरसणार

एमपीएससीने या निर्णयाबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे गुरुवारी दिली असून या निर्णयाचे स्वागत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी केले आहे. एमपीएससीने जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

Mumbai Crime : मुंबई फिरण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या फॅशन डिझायनर तरुणीवर उद्योगपतीनं केला बलात्कार

मात्र आता या परीक्षांच्या नियोजनात बदल करण्यात आले आहे. प्रशासकीय कारणास्तव या दोन्ही परीक्षा पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या दोन्ही परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. ही परीक्षा घेतांना पदसंख्या, आरक्षणात काही बदल झाल्यास त्याची माहिती देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जणार आहे.

आतापर्यंत घेण्यात आलेल्या सरळसेवा भरतीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे या परीक्षांवर आणि एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तलाठी भरती परीक्षेतही हा घोळ पुढे आला आहे. त्यामुळे एमपीएससीने प्रत्यक्ष (ऑफलाइन) पद्धतीनेच परीक्षा घ्यावी अशी मागणी केली जात होती. अखेर एमपीएससीने उमेदवारांची मागणी मान्य केली असून महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या दोन परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या