पुणे : बंगालच्या उपसागरावर तीव्र कमी दाबचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबचा पट्टा ओडिशाच्या दिशेने सरकत असून यामुळे आज पासून पुढील तीन दिवस राज्यात मॉन्सून सक्रिय होणार आहे. १५, १६ आणि १७ तारखेला जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. मुंबईला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यामध्ये शनिवारी 'ऑरेंज अॅलर्ट' तर, पुणे, सातारा येथील घाट परिसरात शनिवार आणि रविवार या दोन दिवशी ऑरेंज अॅलर्ट पुणे वेध शाळेने वर्तवला आहे.
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाच्या दिशेने पुढे सरकत आहे. परिणामी शुक्रवारी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, नाशिक, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर हे जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
कोकण गोव्यात उद्या आणि परवा बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात आज संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगावला १६ तारखेला, तर पुणे आणि साताऱ्याला १६ आणि १७ तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात १५ आणि १६ तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात १६, १७,१८ ला घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुले यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज पुण्याच्या घाट विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात मागील २४ तासांत हलक्या पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईला गुरुवारी बऱ्याच अवधी नंतर मुसळधार पावसाने झोडपले. हवामान विभागाने मुंबईत आज यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्याला 'ऑरेंज अॅलर्ट' देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरीमध्ये शनिवारी आणि रविवारी; तर सिंधुदुर्गात शनिवारी 'ऑरेंज अॅलर्ट' देण्यात आला आहे.