मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra politics : आगामी लोकसभा निवडणुकीत दिसणार राज्यातील तोडफोडीचा परिणाम, घटू शकतो भाजपाचा ‘जनाधार'!

Maharashtra politics : आगामी लोकसभा निवडणुकीत दिसणार राज्यातील तोडफोडीचा परिणाम, घटू शकतो भाजपाचा ‘जनाधार'!

Jul 06, 2023, 07:48 PM IST

  • Maharashtra politics : अनेक पक्ष व गट युतीत सामील झाल्याने भाजपाचा जनाघार वाढणार की घटणार?  सत्ताधारी युतीमध्ये घटक पक्षांचे वाढणे म्हणजे निवडणुकीच्या वेळी त्या पक्षांना आपल्या हिस्स्याच्या जागा देणे. 

Maharashtra politics

Maharashtrapolitics : अनेक पक्ष व गट युतीत सामील झाल्यानेभाजपाचा जनाघार वाढणार की घटणार?सत्ताधारीयुतीमध्ये घटक पक्षांचे वाढणे म्हणजे निवडणुकीच्या वेळी त्या पक्षांना आपल्या हिस्स्याच्या जागा देणे.

  • Maharashtra politics : अनेक पक्ष व गट युतीत सामील झाल्याने भाजपाचा जनाघार वाढणार की घटणार?  सत्ताधारी युतीमध्ये घटक पक्षांचे वाढणे म्हणजे निवडणुकीच्या वेळी त्या पक्षांना आपल्या हिस्स्याच्या जागा देणे. 

Maharashtra political crisis : महाराष्ट्रात एनडीएतील घटक पक्ष वाढताना दिसत आहेत. शिवसेनेच्या गटानंतर राष्ट्रवादीचा एक मोठा गटएनडीएमध्ये सामील झाला आहे. मात्र प्रश्न भाजपचा आहे. अशा प्रकारे अनेक पक्ष व गट युतीत सामील झाल्याने भाजपाचा जनाघार वाढणार की घटणार? सत्ताधारी युतीमध्ये घटक पक्षांचे वाढणे म्हणजे निवडणुकीच्या वेळी त्या पक्षांना आपल्या हिस्स्याच्या जागा देणे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभाजागा व ४८ लोकसभा मतदारसंघातील आपल्या वाट्याच्या जागा भाजपला कोणत्या ना कोणत्या गटाला द्याव्या लागतील.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये कमीत मकी आठ जागांवर सरळ-सरळ लढत होती. बारामती सोडून भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या. येथे सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला होता. त्याचबरोबर २८८ जागांपैकी ५६ जागांवर भाजप व राष्ट्रवादीमध्ये काट्याची टक्कर झाली होती. त्यामध्ये भाजपने ३४ जागा जिंकल्या होत्या तर एनसीपीने २२ जागांवर विजय मिळवला होता.

भाजपाच्या बैठकींमध्ये असे म्हटले जाते की, आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर फोकस करायचा आहे. भाजपासाठी लोकसभा निवडणूक करो या मरो अशी झाली आहे. म्हटले जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिंकवण्यासाठी निवडणूक लढायची आहे. मात्र जेव्हा एनसीपी आणि शिवसेनेचा शिंदे गट भाजपासोबत आल्याने भाजपच्या बुथ स्थरावरील परिस्थिती बिघडली आहे. स्थानिक पातळीवर भाजपला नुकसान होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटले आहे की, कार्यकर्त्यांची नाराजी समजू शकतो. मात्र अनेकवेळा परिस्थिती पाहून काही निर्णय घ्यावे लागतात. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, शत-प्रतिशत भाजपाचा नारा खूप मागे राहिला आहे. एका केंद्रीय मंत्र्याने सांगितले की, तात्पुरत्या फायद्यासाठी आम्ही मजूबत पाया हरवत आहोत. केडर बेस़्ड पार्टीसाठी असे तोडफोडीचे राजकारण नुकसानकारक आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र आम्ही येथे थांबणार नाही. आम्हाला आमची व्होट बँक ३० टक्क्यांवरून ५० टक्के करायची आहे. यासाठी आम्ही कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून बंडखोरांना सामील करून घेतले जात आहे.

पुढील बातम्या