मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सरकार कोसळलं तरी नाराजीनाट्य थांबेना, सेनेचा आणखी एक आमदार नॉट रिचेबल

सरकार कोसळलं तरी नाराजीनाट्य थांबेना, सेनेचा आणखी एक आमदार नॉट रिचेबल

Jun 30, 2022, 12:30 PM IST

    • शिवसेनेतील बंडखोरी नाट्याचा शेवट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापर्यंत गेलं. यानंतर आता आणखी एक आमदार शिंदे (Eknath Shinde) गटात गेल्याचं म्हटलं जात आहे.
उद्धव ठाकरे (फोटो - एएनआय)

शिवसेनेतील बंडखोरी नाट्याचा शेवट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापर्यंत गेलं. यानंतर आता आणखी एक आमदार शिंदे (Eknath Shinde) गटात गेल्याचं म्हटलं जात आहे.

    • शिवसेनेतील बंडखोरी नाट्याचा शेवट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापर्यंत गेलं. यानंतर आता आणखी एक आमदार शिंदे (Eknath Shinde) गटात गेल्याचं म्हटलं जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा देईपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी राज्यात घडल्या. मात्र यात शिवसेनेला (Shivsena) आणखी एक धक्का बसला आहे. आता शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर (Ravindra Vaikar) हे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. रविंद्र वायकर हे शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर सरकारही कोसळले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही आणखी एका आमदाराने शिंदे गटाची वाट धरल्यानं शिवसेनेला पुन्हा एक धक्का बसल्याचं मानलं जातंय.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत. याशिवाय अपक्ष आमदारांची संख्या ११ आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे संख्याबळ सध्या ५१ आहे, यातच आता त्यात रविंद्र वायकर यांच्यामुळे एका आमदाराची भर पडली असल्याचं म्हटलं जातंय. रविंद्र वायकर हे शिवसेना विभाग क्रमांक ३ जोगेश्वरी , गोरेगांव ,दिंडोशी विधानसभेच्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात सहभागी झाले होते. नेस्को गोरेगांव पूर्व इथे हा मेळावा पार पडला होता. यातला एक फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये आता भाजप आणि शिंदे गटात मंत्रीपदावरून वाटाघाटी होतील. त्यात रविंद्र वायकर नॉट रिचेबल झाल्यानं यांना मंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची चर्चा आहे.

भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदासह ८ कॅबिनेट मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय ५ आमदारांना राज्यमंत्रीपद मिळेल असंही म्हटलं जात आहे. तर भाजपचे २९ आमदार मंत्री होतील. या दोन्हीशिवाय अपक्ष आमदारांनाही मंत्रिपदे दिली जाणार आहेत. अद्याप याबाबत अधिकृत माहिती भाजप किंवा शिंदे गटाने दिलेली नाही. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मात्र अजुनही भाजपसोबत मंत्रिपदे किती आणि कोणती याबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे. तसंच ही चर्चा लवकरच होईल असंही त्यांनी सांगितलं.

पुढील बातम्या