मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला तीळमात्र सहानुभूती नाही: मनसे

MNS on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला तीळमात्र सहानुभूती नाही: मनसे

Jun 30, 2022, 12:14 PM IST

    • MNS Reaction on Uddhav Thackeray Resignation: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत असून मनसेनंही यावर मत मांडलं आहे.
Raj Thackeray - Uddhav Thackeray

MNS Reaction on Uddhav Thackeray Resignation: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत असून मनसेनंही यावर मत मांडलं आहे.

    • MNS Reaction on Uddhav Thackeray Resignation: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत असून मनसेनंही यावर मत मांडलं आहे.

Ameya Khopkar on Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यातील सरकार अल्पमतात आल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून उद्धव ठाकरे यांच्या कारभाराचं, स्वभावाचं व सरकारचं कौतुक केलं जात आहे. त्याच वेळी विरोधकांकडून वेगवेगळ्या मार्गांनी उद्धव ठाकरे यांच्या टिकाटिप्पणी सुरू केली आहे. स्थापनेपासूनच शिवसेनेशी राजकीय स्पर्धा करणाऱ्या मनसेनं या संपूर्ण घडामोडींवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. 'प्रत्येक प्रसंगात राज ठाकरे यांचं नुकसान करणाऱ्या, राजसाहेबांची माणसं फोडणाऱ्या, राजसाहेब यांच्याबद्दल सतत द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तीळमात्र सहानुभूती नाही, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेलं सत्तानाट्य काल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलं. सर्वोच्च न्यायालयानं बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याआधी त्यांनी राज्यातील जनतेला उद्देशून भावनिक भाषण केलं. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेही आभार मानले.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळं शिवसैनिकांमध्ये दु:ख व संतापाची भावना आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. सत्ता येते आणि जाते, मात्र ज्या पद्धतीनं सरकार घालवण्यात आलं ते योग्य नव्हतं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांच्या या प्रतिक्रियेशी राज्यातील अनेकांनी सहमती दर्शवली आहे. शिवसेनेच्या आमदारांना वेगवेगळी आमिषं व भीती दाखवून फोडलं गेल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. ती आता उघडपणे होऊ लागली आहे. ठाकरे सरकारमधील बंडखोर मंत्री व आमदारांना दिल्या गेलेल्या निधीचे आकडेही व्हायरल होत आहेत. त्यामुळंच शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सर्वत्र सहानुभूती व्यक्त होत आहे. या राजीनाम्याचं अनेकांना दु:ख झालं आहे. मनसेनं मात्र याही परिस्थितीत उद्धव ठाकरे व शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

पुढील बातम्या