मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune High Alert : पुणे शहरात हाय अलर्ट; चौकाचौकांत मोठा पोलीस बंदोबस्त, नेमकं कारण काय?

Pune High Alert : पुणे शहरात हाय अलर्ट; चौकाचौकांत मोठा पोलीस बंदोबस्त, नेमकं कारण काय?

Aug 15, 2023, 01:53 PM IST

  • High Alert In Pune : पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातून अतिरेक्यांना अटक केली जात आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी शहरात अलर्ट जारी केला असून ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

High Alert In Pune City (HT)

High Alert In Pune : पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातून अतिरेक्यांना अटक केली जात आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी शहरात अलर्ट जारी केला असून ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

  • High Alert In Pune : पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातून अतिरेक्यांना अटक केली जात आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी शहरात अलर्ट जारी केला असून ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

High Alert In Pune City : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातून संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात येत आहे. कोंढवा आणि कोथरुड परिसरातून कुख्यात अतिरेक्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता स्वातंत्र्यदिनी पुणे पोलिसांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांत हाट अलर्ट जारी केला आहे. तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी पोलिसांकडून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेण्यात येत आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा आदेश जारी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातून काही अतिरेक्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता स्वातंत्र्यदिन तसेच गणेशोत्सवाच्या काळात शहरात कडक बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. शहरातील अनेक ठिकाणी पोलीस साध्या वेशात गस्त घालत आहे. शिवाजीनगर एसटी बस स्थानक आणि केल्वे स्टेशन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच लॉज आणि हॉटेल्सची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. शहराबाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक मार्गांवर नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. देशातील कुख्यात दहशतवादी संघटनांना मदत करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसने आयसिस, अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या सात लोकांना अटक केली होती. याशिवाय शहरातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना दोन अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. दोन्ही आरोपी एनआयएच्या फरार गुन्हेगारांच्या यादीत होते. त्यामुळं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी अतिरेक्यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून आणखी पाच लोकांना अटक केली आहे. याशिवाय मुंढवा, हडपसर, कोंढवा आणि कोथरुड या भागात पोलिसांकडून अटकसत्र सुरू असल्याची माहिती आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या