मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Monsoon Alert : खुशखबर..! मान्सून गोव्याच्या वेशीवर, येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

Monsoon Alert : खुशखबर..! मान्सून गोव्याच्या वेशीवर, येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

Jun 10, 2023, 06:47 PM IST

  • Monsoon Update : मान्सूचा प्रवास आणि वेग असाच सुरू राहिल्यास पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.

monsoon update

Monsoon Update : मान्सूचा प्रवास आणि वेग असाच सुरू राहिल्यासपुढील ४८ तासात केरळ,कर्नाटक,तामिळनाडू,गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.

  • Monsoon Update : मान्सूचा प्रवास आणि वेग असाच सुरू राहिल्यास पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.

Monsoon Update Maharashtra :दोन दिवसापूर्वी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सूनचा भारतातील प्रवास सुरू झाला आहे. मान्सूनने आज तामिळनाडू आणि कर्नाटकाचा काही भाग व्यापला आहे. मान्सूचा प्रवास आणि वेग असाच सुरू राहिल्यास पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

चक्रीवादळामुळे मान्सून सक्रीय झाला आहे.त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणात काही ठिकाणी पावसास सुरुवात झाली आहे. अनुकूल वातावरण असल्यामुळे पुढील ४८ तासात मान्सून गोव्याच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत महाराष्ट्र,गोव्यात पावसाचं आगमन होऊ शकतं. नैऋत्य मान्सून आज कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढं सरकला असून पुढील ४८ तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान,पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ गेल्या ६ तासांत प्रतितास ९ किमी वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. आज १० जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ५.३० वाजता ते अरबी समुद्रातील उत्तरेला घोंघावत होते. हे चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमी, मुंबईच्या पश्चिम-नैऋत्येस ६३० किमी, पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस ६२० किमी आणि कराचीच्या दक्षिणेस ९३० किमी अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

 

पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढील ३ दिवसांत ते हळूहळू उत्तर-वायव्य दिशेकडे सरकेल.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या