मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Karnataka Border Dispute : “अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावं लागेल”, छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

Karnataka Border Dispute : “अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावं लागेल”, छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

Dec 06, 2022, 06:28 PM IST

  • Maharashtra Karnataka border dispute : बेळगावमध्ये महाराष्ट्रातील ट्रकांवर कन्नडीगांनी दगडफेक केली आहे. यावर छत्रपती संभाजीराजेंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे की, सौंदती यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील लाखो भाविक कर्नाटकात आहेत. त्यांना सुरक्षा द्यावी अन्यथा मला तिकडे यावे लागेल. 

 छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

Maharashtra Karnataka border dispute : बेळगावमध्ये महाराष्ट्रातील ट्रकांवर कन्नडीगांनी दगडफेक केली आहे. यावर छत्रपती संभाजीराजेंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे की, सौंदती यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील लाखो भाविक कर्नाटकात आहेत. त्यांना सुरक्षा द्यावी अन्यथा मला तिकडे यावे लागेल.

  • Maharashtra Karnataka border dispute : बेळगावमध्ये महाराष्ट्रातील ट्रकांवर कन्नडीगांनी दगडफेक केली आहे. यावर छत्रपती संभाजीराजेंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे की, सौंदती यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील लाखो भाविक कर्नाटकात आहेत. त्यांना सुरक्षा द्यावी अन्यथा मला तिकडे यावे लागेल. 

कर्नाटक आणि महाराष्ट्रमधील सीमावाद हिंसक बनला असून आज दोन्ही राज्यात एकमेकांच्या बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. कर्नाटकमधील हिरे बागेवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील नंबर प्लेट असणाऱ्या ट्रकांवर दगडफेक करण्यात आली. कन्नड लोकांनी रस्त्यावर उतरून निर्देशने केली. यानंतर आता राज्यातील नेते आक्रमक झाले आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

Maharashtra Weather Update: पुणे, कोल्हापूर, सातारा, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता! मुंबईत उकाडा कायम

संभाजीराजेंनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ''छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.'' त्यांनी कर्नाटक सरकारला इशारा देत म्हटलं आहे की, ''रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापुरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत. त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल.''

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटकामधील सध्याचा वाद हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे. एकदा नव्हे, दोन-तीनदा त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. आज महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला झाला आहे. त्यानंतरही महाराष्ट्रातील जनता संयम राखून आहे,पण संयमाला मर्यादा असतात. हा संयम सुटू नये याची काळजी कर्नाटक व केंद्र सरकारनं घ्यायला हवी. अन्यथा उद्रेक झाल्यास त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात पुण्याहून बंगळुरुच्या दिशेनं जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पाच ते सहा वाहनांवर दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं आता दोन्ही राज्यांत सीमावादाच्या प्रश्नावरून राजकीय वादंग पेटलेलं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन करून बेळगावातील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध केला आहे. बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करणाऱ्या कन्नड वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फडणवीसांना सांगितलं आहे. याशिवाय महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना दुरध्वनीद्वारे दिली आहे.

पुढील बातम्या