मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Health Department Exam : आरोग्य विभागातील भरतीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखांना होणार परीक्षा

Health Department Exam : आरोग्य विभागातील भरतीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखांना होणार परीक्षा

Aug 26, 2022, 11:45 PM IST

    • मागील तीन वर्षापासून रखडलेली आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अखेर जाहीर झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागात ही (Health Department Recruitment) भरती होणार आहे.
आरोग्य विभागातील भरतीचे वेळापत्रक जाहीर

मागील तीन वर्षापासून रखडलेली आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अखेर जाहीर झाली आहे.राज्यातील जिल्हा परिषदांमधीलआरोग्य विभागात ही(Health Department Recruitment)भरती होणार आहे.

    • मागील तीन वर्षापासून रखडलेली आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अखेर जाहीर झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागात ही (Health Department Recruitment) भरती होणार आहे.

मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या काळात पेपर लीकमुळे दोन वेळा रद्द कराव्या लागलेल्या व मागील तीन वर्षापासून रखडलेली आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अखेर जाहीर झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागात ही (Health Department Recruitment) भरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून होणार असून आरोग्य विभागातील गट 'क' च्या भरतीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. 

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

आज जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी गट क या पदांसाठी परीक्षा (Health Department Exam) घेतली जाणार आहे. परीक्षा घेतल्यानंतर पुढच्या १५ दिवसात निकाल जाहीर करून गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

सरकारकडून आज सांगण्यात आले की, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. १५ आणि १६ ऑक्टोबरला परीक्षा आयोजित करून १७ ते ३१  ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 

मार्च २०१९ पासून म्हणजे देशव्यापी कोरोना लॉकडाऊन लागू होण्याच्या आधीपासून ही भरती प्रक्रिया रखडली आहे. मार्च २०१९च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी सबंधित गट-क पदांच्या भरती बाबत आज शासन निर्णय जारी करण्यात आला. गट क मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी ही मुख्यत्वे करून भरती केली जाणार आहे.

दरम्यान गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड प्रवर्गासाठी परीक्षा झाली होती. त्यावेळी या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. यामध्ये न्यासा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले होते. 

पुढील बातम्या