मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला भक्कम.. मुक्ताईनगरमधील १३ पैकी १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी विजयी

एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला भक्कम.. मुक्ताईनगरमधील १३ पैकी १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी विजयी

Dec 20, 2022, 05:36 PM IST

  • Gram Panchayat Election Result : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा जल्लोष असून अनेक मातब्बरांना धक्के बसत आहेत. मात्र मुक्ताईनगरात एकनाथ खडसे यांची एकहाती वर्चस्व राखत १३ पैकी १२ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता खेचून आणली आहे.

एकनाथ खडसे

Gram Panchayat Election Result : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा जल्लोष असून अनेक मातब्बरांना धक्के बसत आहेत. मात्र मुक्ताईनगरात एकनाथ खडसे यांची एकहाती वर्चस्व राखत १३ पैकी १२ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता खेचून आणली आहे.

  • Gram Panchayat Election Result : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा जल्लोष असून अनेक मातब्बरांना धक्के बसत आहेत. मात्र मुक्ताईनगरात एकनाथ खडसे यांची एकहाती वर्चस्व राखत १३ पैकी १२ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता खेचून आणली आहे.

Gram Panchayat ElectionNews : राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा जल्लोष सुरु आहे.राज्यातील विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. येवल्यात छगन भुजवळांना धक्का बसला असून मुक्ताईनगरमधील ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ खडसे यांचे एक हाती वर्चस्वपुन्हा सिद्ध झाले आहे. येथील एकूण १३ पैकी १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. बाळासाहेबांची शिवसेनेला येथे धक्का बसला असून शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा हा मतदारसंघ असून त्यांना एकाही ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

मुक्ताईनगरमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर एकनाथ खडसे यांनी एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. या ठिकाणी एकूण १३ पैकी १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे. एकनाथ खडसे यांचा जिल्हा दूध संघात मोठा पराभव झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर खडसे म्हणाले की, भाजप व शिंदे गटाला या निवडणुकीत जनतेने नाकारले आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा हा मतदारसंघ असताना एकही ग्रामपंचायतीवर त्यांना विजय मिळवता आलेला नाही. या निकालातून जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभी असल्याचे स्पष्ट झालं आहे.

जळगाव जिल्ह्यातील१२२ ग्रामपंचायत निकाल -

राष्ट्रवादी काँग्रेस -५५

भाजप -३३

शिंदे गट -१६

काँग्रेस -१०

उद्धव ठाकरे गट -४

इतर -४

निकालानंतर दगडफेक, एकाचा मृत्यू -

जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू असतांना जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले. यात हाणामारी आणि दगडफेक झाल्याने या घटनेत एका भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. धनराज माळी (वय २५) असे मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

 

पुढील बातम्या