मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. सरकारकडून नुकसान भरपाईच्या रक्कमेत दुपटीने वाढ

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. सरकारकडून नुकसान भरपाईच्या रक्कमेत दुपटीने वाढ

Dec 15, 2022, 05:48 PM IST

  • double compensation to farmer : शिंदे सरकारने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठी दिलासा देत नुकसान भरपाईच्या रक्कमेत दुपटीने वाढ केली आहे. जाणून घ्या आता किती मिळणार नुकसान भरपाई..

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा..

double compensation to farmer : शिंदे सरकारने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठी दिलासा देत नुकसान भरपाईच्या रक्कमेत दुपटीने वाढ केली आहे. जाणून घ्या आता किती मिळणार नुकसान भरपाई..

  • double compensation to farmer : शिंदे सरकारने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठी दिलासा देत नुकसान भरपाईच्या रक्कमेत दुपटीने वाढ केली आहे. जाणून घ्या आता किती मिळणार नुकसान भरपाई..

मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये प्रती हेक्टर दुप्पट वाढ केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिरायती पिकाच्या नुकसानीसाठी ६ हजार ८०० रुपयांऐवजी आता १३ हजार ६०० रुपये मिळणार आहेत. बागायती पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० ऐवजी आता २७ हजार रुपये मिळणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी १८ हजारऐवजी आता ३६ हजार रुपये मिळणार आहेत. इतकेच नाही तर सरकारने नुकसानीची क्षेत्र मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

शिंदे सरकारने यापूर्वीअतिवृष्टी, अवकाळी पाऊसयामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत जाहीर केली होती. त्यानंतरही विरोधकांनी ही मदत पुरेशी नसल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सुखद वार्ता दिली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.

जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत महसूल विभागानं शासन निर्णय जारी केला आहे.

 

पुढील बातम्या