मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pension to Journalist : ज्येष्ठ पत्रकारांना आता सरकार देणार दर महिन्याला २० हजार रुपये

Pension to Journalist : ज्येष्ठ पत्रकारांना आता सरकार देणार दर महिन्याला २० हजार रुपये

Mar 15, 2024, 05:57 PM IST

    • राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 
Pension Scheme to Journalists in Maharashtra

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

    • राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजने’ अंतर्गत राज्यातील अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सध्या प्रती महिन्याला ११ हजार रुपये सन्मान निधी मिळतो. आता या रकमेत नऊ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे राबवण्यात येते योजना

राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पत्रकार सन्मान निधीची योजना राबविण्यात येते. या योजनेचे निकष व कार्यपद्धतीनुसार केवळ महाराष्ट्रातील अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांनाच या योजनेचा लाभ मिळतो. ही मासिक अर्थसहाय्याची रक्कम ‘शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी’ मधील ५० कोटी इतक्या मुदत ठेवीच्या व्याजाच्या रकमेतून देण्यात येते. मासिक २० हजाराची ही रक्कम ज्येष्ठ पत्रकाराच्या बँक खात्यात थेट जमा (Direct Benefit Transfer) होणार आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची रक्कम ३५ कोटींवरून वाढवून ५० कोटी करण्यात आला आहे.

यासंदर्भात गेल्या वर्षीच्या विधानसभा अधिवेशनात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत पत्रकारांच्या सन्मान निधीसंदर्भात चर्चा उपस्थित केली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अर्थसहाय वाढविण्याची घोषणा केली होती.

सध्या यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचारार्थ आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने २००९ साली माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नावाने पत्रकार कल्याण निधीची स्थापना करण्यात आली होती.

पुढील बातम्या