मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mla Salary Hike : आमदारांच्या मानधनात तब्बल ४० हजारांची घसघशीत वाढ, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Mla Salary Hike : आमदारांच्या मानधनात तब्बल ४० हजारांची घसघशीत वाढ, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Sep 07, 2023, 09:04 PM IST

  • Mamata Banerjee hike mla salary : पश्चिम बंगालमधील आमदारांच्या पगारात तब्बल ४० हजार रुपयांची वाढ झाल्याने महाराष्ट्रनंतर पश्चिम बंगालमधील आमदारांच्या मानधनात वाढ झाली आहे.

Mamata Banerjee hike mla salary

Mamata Banerjee hike mla salary : पश्चिम बंगालमधीलआमदारांच्या पगारात तब्बल४०हजार रुपयांची वाढ झाल्यानेमहाराष्ट्रनंतर पश्चिम बंगालमधील आमदारांच्या मानधनात वाढ झाली आहे.

  • Mamata Banerjee hike mla salary : पश्चिम बंगालमधील आमदारांच्या पगारात तब्बल ४० हजार रुपयांची वाढ झाल्याने महाराष्ट्रनंतर पश्चिम बंगालमधील आमदारांच्या मानधनात वाढ झाली आहे.

पश्चिम बंगालच्या आमदारांसाठी मोठी खुशखबर आहे. मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी गुरुवारी आमदारांचे वेतन वाढवण्याची घोषण केली. पश्चिम बंगाल विधानसभा मान्सून अधिवेशनाच्या अंतिम दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमदार व मंत्र्यांच्या मानधनात ४० हजार रुपये प्रति महिना अशी घसघशीत वाढ केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Afghanistan floods: अफगाणिस्तानमध्ये पावसाचा कहर, पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू

Attack on Israel : राफावर हल्ल्याआधी इस्लामिक संघटनेने इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र; युद्ध आणखी भडकणार

Viral news: हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या जेवणात मिसळत होता प्रायव्हेट पार्ट अन् करत होता लघवी! वेटरचे घाणेरडे कृत्य

Viral news : पाचवीच्या विद्यार्थ्यावर शिक्षिका करत होती बलात्कार! आईने पकडले रंगेहात! काही दिवसात होणार होते लग्न

आमदारांचे वेतन वाढवण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री ममता म्हणाल्या की, आधी देशात सर्वात कमी मानधन बंगालच्या आमदारांना मिळत होते. यापूर्वी बंगालच्या आमदारांना प्रति महिना केवळ १० हजार रुपये मानधन मिळत होते. आता त्यांना ५० हजार रुपये मिळणार आहेत. दरम्यान बंगालच्या मंत्र्यांना ५१ हजार रुपये मिळतील. दरम्यान आता सवाल उपस्थित केला जात आहे की, काय मुख्यमंत्री ममता यांच्या वेतनातही वाढ होणार का? मुख्यमंत्री ममता यांनी सभागृहाला संबोधित करताना स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या वेतन व मानधनात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. मागील अनेक वर्षापासून ममता वेतन घेत नाहीत.

 

पश्चिम बंगालमधील आमदारांच्या पगारात तब्बल ४० हजार रुपयांची वाढ झाल्याने महाराष्ट्रनंतर पश्चिम बंगालमधील आमदारांच्या मानधनात वाढ झाली आहे. या पगारवाढीच्या घोषणेमुळे आमदारांना आता १० ऐवजी ४० हजार रुपये दरमहा मिळणार आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या राज्यमंत्र्यांना १० हजार ९०० रुपयांऐवजी ५० हजार ९०० रुपये मिळणार आहेत. तसेच कॅबिनेट मंत्र्यांना ११ हजार ऐवजी ५१ हजार रुपये मानधन मिळणार आहेत.

 

आमदारांच्या वेतन वाढीमुळे एकूण देय रक्कम एक लाखांच्या वर गेली आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेतन आणि अन्य भत्त्यांसह आमदारांना दरमहा मिळणारी एकूण रक्कम ही ८१ हजार रुपयांवरुन १ लाख २१ हजार रुपये इतकी होईल. तर मंत्र्यांना मिळणाऱ्या १ लाख १० हजार रुपयांऐवजी आता १ लाख ५० हजार रुपये महिना झाली आहे.

विभाग

पुढील बातम्या