मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजाला दान केलेल्या भेटवस्तूंचा लिलाव

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजाला दान केलेल्या भेटवस्तूंचा लिलाव

Oct 01, 2023, 09:00 PM IST

    • Lalbaugcha Raja Auction: लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याचा आणि चांदीच्या वस्तूंचा लिलाव केला जात आहे.
Lalbaugcha Raja auction

Lalbaugcha Raja Auction: लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याचा आणि चांदीच्या वस्तूंचा लिलाव केला जात आहे.

    • Lalbaugcha Raja Auction: लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याचा आणि चांदीच्या वस्तूंचा लिलाव केला जात आहे.

Lalbaugcha Raja Gifts Auction: लालबाग राजाच्या दर्शनासाठी फक्त मुंबईतून नव्हेतर संपूर्ण देशभरातून भाविक येतात. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ख्याती असलेल्या लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी यावर्षी लाखोच्या संख्येत उपस्थिती दर्शवली. यावेळी भाविकांनी नेहमीप्रमाणे लालबागचा राजाच्या चरणी दान अर्पण केले. यातील दुचाकीची सर्वाधिक चर्चा रंगली होती. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अशा भेटवस्तूंचा लिलाव केला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांनी लालबाग राजाच्या चरणी अंदाजे अडीच कोटींचे सोने आणि चांदीच्या वस्तू दान केल्या. याशिवाय, पाच कोटी १६ लाख इतकी देणगी दान पेटीत जमा झाली. एवढेच नव्हेतर एका भाविकाने यावर्षी लालबाग राजाच्या चरणी इलेक्ट्रीक दुचाकी अर्पण केली. ज्याची सगळीकडे चर्चा रंगली होती. अशा भेटवस्तूच्या लिलाव करण्यात आला. बाप्पा चरणी अर्पण करण्यात आलेल्या भेटवस्तूंचा लिलाव सुरू झाला.

मुकुट, झुंबर, छत्री, जास्वंदी हार, अंगठी, चैन, बांगडी, गणेश मूर्ती, इमारतीची प्रतिकृती, उंदीर अशा लागबागचा राजाला दान करण्यात आलेल्या सोन्याच्या वस्तू आहेत. याशिवाय, बाप्पाला दान करण्यात आलेल्या ६४ किलो चांदीच्या वस्तूंची नोंद करण्यात आली. ज्यात चांदीचा पाट, भव्य मोदक, गणेश मूर्ती, छत्री, मुकुट, केळीचे पान, चांदीच्या केळी आणि प्रसाद, नारळ, कलश, घंगाळे, समई, जास्वंदीचे फुलांचा समावेश आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या