मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BJP New Executives: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतील एकमेव मुस्लिम चेहरा कोण?

BJP New Executives: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतील एकमेव मुस्लिम चेहरा कोण?

May 03, 2023, 07:11 PM IST

    • भाजपच्या आज जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत एकमेव मुस्लिम चेहऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. आगामी निवडणुका पाहता मुस्लिम बहुल मतदारसंघात अधिक काम करण्याची गरज बावनकुळे यांनी नुकतीच व्यक्त केली होती
एजाज देशमुख, अध्यक्ष, भाजप अल्पसंख्याक सेल

भाजपच्या आज जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत एकमेव मुस्लिम चेहऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. आगामी निवडणुका पाहता मुस्लिम बहुल मतदारसंघात अधिक काम करण्याची गरज बावनकुळे यांनी नुकतीच व्यक्त केली होती

    • भाजपच्या आज जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत एकमेव मुस्लिम चेहऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. आगामी निवडणुका पाहता मुस्लिम बहुल मतदारसंघात अधिक काम करण्याची गरज बावनकुळे यांनी नुकतीच व्यक्त केली होती

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पक्षाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानतंर तब्बल ८ महिन्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून इतर मागासवर्ग तसेच महिलांना प्रामुख्याने स्थान देण्यात आल्याचं दिसतं. भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत एकमेव मुस्लिम चेहऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता मुस्लिम बहुल मतदारसंघात अधिक काम करण्याची गरज बावनकुळे यांनी नुकतीच व्यक्त केली होती. त्या अनुरूप राज्यातील भाजप अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष एजाज देशमुख यांचा प्रदेश कार्यकारिणीत पुन्हा समावेश करण्यात आला आहे. देशमुख हे मराठवाड्यातील बीड येथील भाजपचे पदाधिकारी असून भाजप अल्पसंख्याक सेलसाठी गेली अनेक वर्ष काम करतात. शिवाय भाजप प्रवक्ते म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

कोण आहे एजाज देशमुख?

एजाज देशमुख हे मराठवाड्यातील बीडचे असून सध्या भाजप अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष म्हणून गेली काही वर्ष कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपचे महामंत्री म्हणून काम केले आहे. सध्या देशमुख यांना प्रदेश भाजपमध्ये उपाध्यक्षपद देण्यात आलं असून भाजपचे राज्य प्रवक्ते म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती.

नव्या चेहऱ्यांना संधी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात १६ प्रदेश उपाध्यक्ष, सहा प्रदेश सरचिटणीस, १६ चिटणीस आणि ५ संघटन मंत्री जाहीर केले आहे. मात्र विविध आघाड्या आणि प्रकोष्ठाची नियुक्ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

 

 

पुढील बातम्या