मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हुंड्यापोटी २ लाख रुपये न दिल्याने दिला तीन तलाक, धक्क्याने सासूचे निधन; गुन्हा दाखल

हुंड्यापोटी २ लाख रुपये न दिल्याने दिला तीन तलाक, धक्क्याने सासूचे निधन; गुन्हा दाखल

Dec 28, 2022, 03:36 PM IST

  • Triple Talaq : लग्नात २ लाख रुपये हुंडा न दिल्याने महिलेला पतीने तिहेरी तलाक दिला होता. या धक्क्याने पीडितेच्या आईचे निधन झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

सांकेतिक छायाचित्र

Triple Talaq : लग्नात २ लाख रुपये हुंडा न दिल्याने महिलेला पतीने तिहेरी तलाक दिला होता. या धक्क्याने पीडितेच्या आईचे निधन झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

  • Triple Talaq : लग्नात २ लाख रुपये हुंडा न दिल्याने महिलेला पतीने तिहेरी तलाक दिला होता. या धक्क्याने पीडितेच्या आईचे निधन झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

लखनौमध्ये पीडितेने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे पत्नीला तिहेरी तलाक दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.अमीनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन लाखांची मागणी पूर्ण न केल्याने मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून लावल्याने पीडितेने सांगितले. या धक्क्याने पीडितेच्याआईचा मृत्यू झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

मौलवीगंज चिकमंडी येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय तरुणीचा विवाह १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सीतापूर लाहारपूर येथील मोहम्मद युनूस यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर लगेचच कमी हुंडा आणला म्हणून सासरच्यांनी अत्याचार सुरू केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. छोटय़ा छोटय़ा गोष्टीवरून सासरच्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. लग्नात मिळालेले दागिने आणि भेटवस्तूही सासू साबिरा घेऊन गेल्या. सासू साबिरा,पती युनूस आणि सासरा मोहम्मद रफिक, जाऊ हसीना, दीर फन्ना, नईम आणि कलीम यांनी तिच्या माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी पीडितेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने४मे रोजी बेदम मारहाण करून घराबाहेर काढले. या धक्क्याने पीडितेच्या आईचाही मृत्यू झाला.

यानंतरही तिने सासरच्या लोकांशी फोनवरून संवाद साधत राहिली. फोनवरील संभाषणादरम्यान युनूसने पुन्हा दोन लाख रुपयांच्या मागणीचा पुनरुच्चार केला. नकार दिल्यावर आरोपीने तीन वेळा तलाकचा उच्चार केला. अमिनाबादचे निरीक्षक कृष्णवीर सिंग यांनी सांगितले की,आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या