मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sheetal Mhatre Video : शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Sheetal Mhatre Video : शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Mar 13, 2023, 08:11 PM IST

    • Sheetal Mhatre Video : शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून जोरदार राजकीय वादंग पेटलेलं आहे.
LOP Ajit Pawar On Sheetal Mhatre Viral Video (HT)

Sheetal Mhatre Video : शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून जोरदार राजकीय वादंग पेटलेलं आहे.

    • Sheetal Mhatre Video : शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून जोरदार राजकीय वादंग पेटलेलं आहे.

LOP Ajit Pawar On Sheetal Mhatre Viral Video : शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही पाहायला मिळाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय या प्रकरणातील सूत्रधाराला शोधून कठोर शिक्षा देण्याचीही मागणी अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून चांगलंच राजकीय वातावरण तापलेलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai, Pune weather update : मुंबईत उष्णतेच्या लाटेने तर उन आणि पावसाने पुणेकर झाले हैराण!

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Maharashtra Weather Update: अवकाळी पाऊस काही थांबेना! रायगड, रत्नागिरी, नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार बोलताना म्हणाले की, एखाद्या लोकप्रतिनिधीनं काहीही केलेलं नसताना कुणी जाणिवपूर्वक त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला का?, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल तर त्याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी 'दूध का दूध, पाणी का पाणी' झालं पाहिजे. या प्रकरणातील वस्तूस्थिती लोकांना आणि सभागृहाला कळायलाच हवं, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राजकारणासह इतर कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना स्वत:चं चारित्र्य स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण राज्यातील लोक आपल्याकडे पब्लिक फिगर म्हणून पाहत असतात. एखाद्याची राजकीय मतं किंवा विचार वेगळे असू शकतात, त्याबद्दल खोलात जायचं कारण नाही. परंतु या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचंही अजित पवार यांनी सभागृहात बोलताना म्हटलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या