मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandharpur : विठ्ठलाच्या चरणी आजपर्यंतचे सर्वात मोठे दान, पावणे दोन कोटींचे सोन्याचे दागिने अर्पण

Pandharpur : विठ्ठलाच्या चरणी आजपर्यंतचे सर्वात मोठे दान, पावणे दोन कोटींचे सोन्याचे दागिने अर्पण

Jan 26, 2023, 02:34 PM IST

  • Vitthal temple pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आतापर्यंतचे सर्वात मोठे दान मिळाले असून एका भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने विठुरायाचरणी अर्पण केले आहेत.

विठ्ठल-रुक्मिणी

Vitthaltemple pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आतापर्यंतचे सर्वात मोठे दान मिळाले असून एका भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने विठुरायाचरणी अर्पण केले आहेत.

  • Vitthal temple pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आतापर्यंतचे सर्वात मोठे दान मिळाले असून एका भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने विठुरायाचरणी अर्पण केले आहेत.

वसंतपंचमीनिमित्त पंढरपुरात विठुराया आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एका भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या इतिहासातील हे सर्वात मोठे दान असल्याचे सांगितले जात आहे. आपले नाव कोठेही जाहीर न करण्याच्या अटीवर या भाविकाने हे दान दिले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एका भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. या दानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीला सोन्याचे मुकुट, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे सोन्याचे दागिने दिले आहेत. याशिवाय देवाच्या नित्योपचारासाठी चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवाचा चांदीचा आरसा असे साहित्य आहे.

मंदिर समितीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठे दान असल्याचे मानले जाते आहे. विठ्ठल मंदिरात आज दुपारी १२ वाजता विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. यानिमित्त पंढरपुरात जय्यत तयारी सुरु आहे. बंगळूरू येथील एका भाविकाने विठ्ठल रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पोषाख भेट दिला आहे. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या