मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न; डिझायनर विरुद्ध गुन्हा दाखल

अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न; डिझायनर विरुद्ध गुन्हा दाखल

Mar 16, 2023, 03:06 PM IST

  • Amurta Fadnavis Bribe Offer News : अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिला डिझायनर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amruta Fadnavis

Amurta Fadnavis Bribe Offer News : अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिला डिझायनर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Amurta Fadnavis Bribe Offer News : अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिला डिझायनर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amurta Fadnavis Bribe Offer News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच ऑफर केल्याप्रकरणी एका महिला डिझायनर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

अनिक्षा असं आरोपी डिझायनरचं नाव आहे. तिच्या वडिलांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. धमकावणे, कट रचणे आणि लाच देण्याचा प्रयत्न करणे या कलमांच्या अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीही सुरू केली आहे.

मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार अनिक्षा ही जवळपास दीड वर्षे अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. तिनं फडणवीस यांच्या निवासस्थानी अनेकदा भेटही दिली होती. अमृता यांच्याशी आपली पुरेशी जवळीक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिनं वडिलांच्या विरोधातील एका खटल्याच्या प्रकरणात मदत करण्याची मागणी अमृता फडणवीस यांच्याकडं केली. त्यासाठी बुकींची माहिती देऊन तब्बल १ कोटी रुपये तुम्हाला देऊ, अशी ऑफरही तिनं आणि तिच्या वडिलांनी दिली. १८ आणि १९ फेब्रुवारीला अनिक्षानं तिच्या व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स व इतर अनेक मेसेज एका अज्ञात फोन नंबरवरून अमृता फडणवीस यांना पाठवले होते. असंही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

या प्रकरणी उल्हासनगर येथून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या प्रकरणाची माहिती विधानसभेत दिली. ‘मला अडचणीत आणायचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला होता. सुदैवानं या संदर्भातील सर्व पुरावे हाती आले आहेत. हे सगळं घडवून आणणारा माणूस हातात आला असता तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या,’ असं फडणवीस यांनी सांगितलं.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या