मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : करुणा शर्मा अडचणीत; जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Pune Crime : करुणा शर्मा अडचणीत; जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Jun 19, 2022, 11:43 PM IST

    • या गुन्ह्यात करूणा शर्मा ( वय ४३, रा. सांताक्रुज, मुंबई) सहआरोपी आहेत. शर्मा यांनी हॉकीस्स्टिकने मारहाण करण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली.
करुणा शर्मा

या गुन्ह्यात करूणा शर्मा ( वय ४३, रा. सांताक्रुज, मुंबई) सहआरोपी आहेत. शर्मा यांनी हॉकीस्स्टिकने मारहाण करण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली.

    • या गुन्ह्यात करूणा शर्मा ( वय ४३, रा. सांताक्रुज, मुंबई) सहआरोपी आहेत. शर्मा यांनी हॉकीस्स्टिकने मारहाण करण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली.

Pune crime काही दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर आरोप करणा-या करुणा शर्मा (karuna Sharma)अडचणीत सापडल्या आहेत. एका विवाहित तरुणीला जातीवाचक शिवीगाळ तसेच पतीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयावर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

 

याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती विरोधात कौटुंबिक हिंसाचार, अनैसर्गिक अत्याचार, मारहाण, धमकावणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात करूणा शर्मा ( वय ४३, रा. सांताक्रुज, मुंबई) सहआरोपी आहेत. शर्मा यांनी हॉकीस्स्टिकने मारहाण करण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच पतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तरुणीने फिर्यादित नमूद केले आहे.

तक्रारदार तरुणी येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर भागात राहायला आहे. तरुणीच्या पतीला घटस्फोट पाहिजे होता. करूणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत तो तिच्यावर दबाब टाकत होता. पती आणि करुणा शर्माने घटस्फोट देण्यासाठी दबाब टाकल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या