मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime :ट्रेडिंगच्या नावाने भुलला; ९ लाख गमावून बसला; तरुणाची ऑनलाईन फसवणूक

Pune Crime :ट्रेडिंगच्या नावाने भुलला; ९ लाख गमावून बसला; तरुणाची ऑनलाईन फसवणूक

Jun 16, 2022, 04:49 PM IST

    • पुण्यात एका तरुणाला कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगून ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ९ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Pune crime (HT_PRINT)

पुण्यात एका तरुणाला कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगून ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ९ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

    • पुण्यात एका तरुणाला कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगून ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ९ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे : तरुणाला एका कंपनीत मोबाईल वरून गुंतवणूक करण्यास सांगून ट्रेडिंगद्वारे आकर्षक परवावा देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची तब्बक ९ लाख २१ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche Car Accident : 'मी मद्यधुंद अवस्थेत होतो; मला काही आठवत नाही'; पोलिस तपासात आरोपी मुलाचा व आईचा असहकार

Pune Porsche Car Accident : आई व बापाने लाडोबाला वाचवण्यासाठी रचला कट! मुलाच्या रक्ताच्या जागी आईने दिले स्वतःचे नमुने

Maharashtra Weather Update: विदर्भ तापलेलाच! नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात हीट वेव्ह! ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज

Swine Flu : नाशिकमध्ये H1N1 व्हायरसचे थैमान! एकाच दिवशी दोघांचे मृत्यू, रुग्णसंख्या २८ वर

रिका लीम, चीफ रीप्रेझेन्टेटीव्ह फॉर एशीया अ‍ॅन्ड मलेशिया व इंडीया फायनान्स कंपनीच्या संचालकाविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अट करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी राजेश मधुकराव गुल्हाने (वय ४७, रा. प्ल्ॉट क्रमांक २०१, जी विंग गॅलक्सी, वंडरसीटी, कात्रज पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीला वरील कंपनीच्या संचालकाने फोनवरून त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच त्याला ट्रेडींगच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याचे आमिशही दाखवले. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने वेळोवेळी मोबाईलवरून आॅलनाईन पद्धतीने वेगवेगळ्या बँक खात्यातून तब्बल ९ लाख २१ हजार रुपये नेटबँकिंग आणि आरटीजीएसद्वारे पाठवले.

यानंतर त्याने कंपनीच्या संचालकाकडे परताव्याची मागणी केली. मात्र, कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच त्याला परतावाही देण्यात आला नाही. यामुळे त्याला त्याची फसवणूक झाल्याचे कळाले. यानंतर त्याने भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यादव पुढील तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या