मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

Nov 04, 2022, 09:12 AM IST

    • Kartiki Ekadashi: पंढरपूरच्या विकासासाठी काशी विश्वनाथच्या धरतीवर कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे हा 2000 कोटींचा विकास आराखडा असून हा विविध टप्प्यांमधून होईल अशी माहितीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊदेत, उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

Kartiki Ekadashi: पंढरपूरच्या विकासासाठी काशी विश्वनाथच्या धरतीवर कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे हा 2000 कोटींचा विकास आराखडा असून हा विविध टप्प्यांमधून होईल अशी माहितीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    • Kartiki Ekadashi: पंढरपूरच्या विकासासाठी काशी विश्वनाथच्या धरतीवर कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे हा 2000 कोटींचा विकास आराखडा असून हा विविध टप्प्यांमधून होईल अशी माहितीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज मला विठूमाऊलीची पुजा करण्याची संधी मिळाल्याने मी अतिशय समाधानी आहे. हा अतिशय भाग्याचा योग असल्याचंही ते म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "विठ्ठल हा सामान्य माणसांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत. त्यांचे जीवन सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी काम करण्याची शक्ती आम्हाला मिळावी. आम्ही अशी प्रार्थना नेहमीच विठ्ठलाला करत असतो. ही पुजा मनाला शांती देणारी असते." कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते करण्यात आली. तर यावेळी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबादमधील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला.

पंढरपूरच्या विकासासाठी काशी विश्वनाथच्या धरतीवर कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे हा 2000 कोटींचा विकास आराखडा असून हा विविध टप्प्यांमधून होईल. या विकासातून कोणालाही विस्थापित केले जाणार नाही तर विस्थापितांना प्रस्थापित करण्याचे काम होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

पंढरपूरच्या विकासकामाबाब बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मंदिर परिसरात कॉरीडॉर तयार करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत मी काल बैठक घेतली आहे. विकासकामे करत असताना पंढरपूरची कोणतीही परंपरा खंडीत होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. कोणालाही विस्थापीत करणार नाही. मात्र, काही जागा घ्यावा लागतील, त्या जागा घेत असताना त्यांना योग्य त्या प्रकारचे पुनर्वसन करण्याची, त्यांचा व्यवसाय योग्य चालला पाहिजे यासंबंधीची काळजी घेतली पाहिजे. अतिशय चांगला कॉरीडॉर तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कॉरीडॉरचे काम करायला जरी वेळ असला तरी मंदिराचे काम करायला आम्ही तत्काळ करायला सुरुवात करणार आहे..

पुढील बातम्या