मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Basavaraj Bommai : ‘आम्हाला तोडण्याची भाषा करतायेत; एक इंचही जमीन देणार नाही’; बसवराज बोम्मई पुन्हा बरळले

Basavaraj Bommai : ‘आम्हाला तोडण्याची भाषा करतायेत; एक इंचही जमीन देणार नाही’; बसवराज बोम्मई पुन्हा बरळले

Dec 27, 2022, 10:09 PM IST

    • Basavaraj Bommai : महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात आज कर्नाटक विरोधात ठराव मांडण्यात आला. यात कर्नाटकातील सर्व गावे पुन्हा परत आणण्याचा ठराव  सभागृहात एकमताने पारित करण्यात आला. या ठरावावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळले असून यावरुन दोन्ही राज्यातील सीमावाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Basavaraj Bommai

Basavaraj Bommai : महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात आज कर्नाटक विरोधात ठराव मांडण्यात आला. यात कर्नाटकातील सर्व गावे पुन्हा परत आणण्याचा ठराव सभागृहात एकमताने पारित करण्यात आला. या ठरावावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळले असून यावरुन दोन्ही राज्यातील सीमावाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

    • Basavaraj Bommai : महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात आज कर्नाटक विरोधात ठराव मांडण्यात आला. यात कर्नाटकातील सर्व गावे पुन्हा परत आणण्याचा ठराव  सभागृहात एकमताने पारित करण्यात आला. या ठरावावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळले असून यावरुन दोन्ही राज्यातील सीमावाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Basavaraj Bommai : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्र विरोधी ठराव करून एक इंचही जमीन देणार नसल्याची वल्गना केली होती. याचे पडसाद नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशात पडले आहेत. विरोधकांनी भाजप आणि शिंदे गटाला धारेवर धरल्यावर आज अखेर विधानसभेत कर्नाटक विरोधात एकमुखी ठराव संमत करण्यात आला. यावेळी कर्नाटकात असलेली ८६५ गावे देखील महाराष्ट्रात समाविष्ट करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. राज्याच्या या ठरावावर बसवराज बोम्मई यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राने आज केलेल्या ठरावाची निंदा केली आहे. महाराष्ट्राने केलेल्या ठरावानंतर बसवराज बोम्मई यांनी आज पुन्हा कर्नाटकच्या सभागृहात त्यांनी कर्नाटकच्या हिताचे रक्षण करण्यासाठी संकल्प केला. आम्हाला तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की कर्नाटकची एक इंच जमीनही आम्ही राज्याला देणार नाही, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या विधान सभेत हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक विरोधात ठराव मंजूर करत कर्नाटकातील ८६५ गावे राज्यात सहभागी करून घेणार असल्याचे सभागृहात सांगितले. तसेच कर्नाटकला एक इंचही जमीन देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यात बेळगावचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या या निर्णयावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईने प्रतिक्रिया दिली आहे, महाराष्ट्राने जो सीमा प्रश्नी ठराव मंजूर केला आहे याची आम्ही निंदा करतो. या ठरावाचे कोणतेही प्रावधान नाही. ते आम्हाला भडकवत असून आमचे राज्य तोडण्याची भाषा देखील करत आहेत. राज्य पुरगठन अधिनियम (१९५६) पारित होऊन अनेक दशके झाली आहेत. दोन्ही राज्यात नागरिक सुखाने राहत आहेत. अशात अशी भाषा वापरणे चुकीचे आहे. महाराष्ट्रातील नेते हे राजकारण करत आहेत. हा ठराव मंजूर करणे म्हणजे एक नौटंकी आहे. कर्नाटकाची एक इंचही जमीन ही महाराष्ट्रात जाणार नाही. आम्ही कर्नाटकात कन्नड भाषिकांची आणि आणि सीमेबाहेर असणाऱ्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्याचे काम कायम सुरूच ठेवणार आहे. सीमा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात दाखल असतांना त्यांनी असा ठराव कसा केला ? आम्ही पारित केलेल्या प्रस्थाव वेगळा आहे. आम्ही संकल्प केला आहे की आमची एक इंच भूमीही आम्ही देणार नाही. सीमा वादाचे प्रकरण कोर्टात प्रलंबीत असतांना या ठरावाचा काहीही अर्थ राहणार नाही, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या