मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune sex racket : पुण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेला ७ वर्ष सक्तमजुरी

Pune sex racket : पुण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेला ७ वर्ष सक्तमजुरी

Dec 20, 2022, 01:01 PM IST

    • Pune sex racket Kalyani Deshpande : हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवत संघटित गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेसह आणखी एकाला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे.
Kalyani Deshpande

Pune sex racket Kalyani Deshpande : हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवत संघटित गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेसह आणखी एकाला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे.

    • Pune sex racket Kalyani Deshpande : हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवत संघटित गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेसह आणखी एकाला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे.

पुणे : पुण्यातील वेश्या व्यावसायच्या माध्यमातून आपले आर्थिक बस्तान बसविणाऱ्या आणिसंघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेसह दोघांना विशेष न्यायालयाने ७ वर्ष सक्तमजुरी आणि १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आहे. ही रक्कम न भरल्यास १ वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

 पिटा आणि मोक्काच्या गुन्ह्यातील झालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचे बोलले जात आहे. अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी या प्रकरणात युक्तीवाद करताना दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

देशपांडेसमवेत प्रदीप गवळी यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुण्यातील कोथरूड भागातील एका सोसायटीमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालविल्याप्रकरणी कल्याणी देशपांडे हिला ऑगस्ट २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. शहरात संघटितपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी कल्याणी देशपांडेवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सेक्स रॅकेटमुळे पुणे हादरले होते. 

यानंतर कल्याणी देशपांडे हिच्यावर शहरातील चतुःशृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, हिंजवडी आदी पोलिस ठाण्यात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. देशपांडे हीचे अनेक गुंडांसमवेत तिचे संबंध असल्याने तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या