मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धव ठाकरे २४ तासांत यू टर्न घेतील असं वाटत नाही: पृथ्वीराज चव्हाण

उद्धव ठाकरे २४ तासांत यू टर्न घेतील असं वाटत नाही: पृथ्वीराज चव्हाण

Jun 23, 2022, 04:03 PM IST

    • Prithviraj Chavan on Shiv Sena Revolt: एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय उलथा पालथ झाली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत बंडखोरांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही.
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan on Shiv Sena Revolt: एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय उलथा पालथ झाली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत बंडखोरांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही.

    • Prithviraj Chavan on Shiv Sena Revolt: एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय उलथा पालथ झाली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत बंडखोरांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही.

Maharashtra political crisis शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचे आव्हान करत तसेच त्यांची भूमिका समजून घेत शिवसेना महाआघाडी सरकार मधून बाहेर पडण्यास तयार आहे, पण सर्व आमदारांनी २४ तासाच्या आत मुंबईत येऊन तशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढे मांडावी अशी घोषणा केली. संजय राऊतांच्या या व्यक्तव्यामुळे पुुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीत राहील की नाही यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर काँग्रेसचे मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रीया वक्त केली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्ह केले. यात त्यांनी असे काही स्पष्ट केले नाही. काल बैठक घेतली त्यातही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे ते २४ तासांत त्यांच्या भूमिकेवरून ते यू टर्न घेतील असे वाटत नाही असे चव्हाण म्हणाले. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय उलथा पालथ झाली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत बंडखोरांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही. दरम्यान, आज खासदार संजय राऊत यांनी सुरत वरून परत आलेल्या आमदारांसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आमदारांची इच्छा असेल तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, पण बंडखोर आमदारांनी २४ तासाच्या आत मुंबईत येऊन त्यांची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगावी.

 

राऊत यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावर पृथ्वीराज चव्हाण एका वृतवाहिनीशी बोतलांना म्हणाले, मला सजमत नाही आहे की ही भूमिका शिवसेनेने आमदारांच्या दबावाखाली घेतली आहे. जर असे असेल तर ते भाजप बरोबर सत्ता स्थापन करणार आहेत का? ते दुय्यम भूमिका घ्यायला तयार आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत चव्हाण म्हणाले, मला वाटत नाही उद्धव ठाकरे ये २४ तासांच्या आत त्यांच्या भूमिकेवरून यु टर्न घेतील. शिवसेनेत जे काही चालले आहे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जर त्यांनी असा यु टर्न घेतला तर ते आश्चर्य राहिल. कारण उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. तेव्हा त्यांनी त्यांची अशी काही भूमिका आहे या बाबत काही स्पष्ट केले नाही. त्यामुळे उद्धवजींनी पुन्हा एकदा या बाबत भूमिका स्पष्ट केले तर बरे राहिल. कारण गोंधळ खूप वाढला आहे. नेमकी शिवसेना कुठल्या गटाकडे आहे याचाही उलगडा होत नाही आहे. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याने निर्णयही त्यांनाच घ्यायचा आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या