मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आदित्य ठाकरेंनी शेंद्रीपाड्यात उभारलेला लोखंडी पुल गेला वाहून; व्हिडिओ व्हायरल

आदित्य ठाकरेंनी शेंद्रीपाड्यात उभारलेला लोखंडी पुल गेला वाहून; व्हिडिओ व्हायरल

Jul 21, 2022, 12:49 PM IST

    • Aaditya Thackeray : काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील शेंद्रीपाड्यात महिलांना पाणी आणण्यासाठी लाकडी पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Shendripada Iron Bridge In Nashik (contentgarden.in)

Aaditya Thackeray : काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील शेंद्रीपाड्यात महिलांना पाणी आणण्यासाठी लाकडी पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

    • Aaditya Thackeray : काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील शेंद्रीपाड्यात महिलांना पाणी आणण्यासाठी लाकडी पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Shendripada Iron Bridge In Nashik : काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील शेंद्रीपाड्यात महिलांना पाणी आणण्यासाठी लाकडी पुलावरून प्रवास करावा लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तात्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्या ठिकाणी तातडीनं लोखंडी पुल उभारण्याचे आदेश दिले होते. पुल उभारल्यानंतर तातडीनं हा प्रश्न सोडवल्यामुळं आदित्य ठाकरेंचं कौतुकही झालं होतं. परंतु आता हा पुल आता पहिल्याच पावसात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता पुल वाहून गेल्यामुळं शेंद्रीपाड्यातील महिलांवर पुन्हा लाकडी पुलावरून पाण्याचे हंडे घेऊन चालण्याची पाळी आली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

काय आहे नेमकं प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह सुरगाण्यातही पाणीटंचाईचं मोठं संकट उभं राहिलं होतं. त्यातच जिल्ह्यातील शेंद्रीपाड्यात काही महिला या लाकडी पुलावरून हंडाभर पाणी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, या घटनेची दखल घेत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली होती. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी लोखंडी पुलही उभारण्यात आला होता. त्याच्या काही दिवसांनंतर आदित्य ठाकरे हे स्वत: त्या पुलाच्या उद्घाटनासाठी आले होते.

पुल पडू शकतो, असं स्थानिकांनी सांगितलं होतं...

युवासेनेच्या पुढाकारानं उभारण्यात आलेला पुल हा जमिनीपासून ३० फुटांवर बसवण्यात आला होता. परंतु हा पुल पावसाळ्यात वाहून जाईल, असा इशारा स्थानिकांनी दिला होता. अशी माहिती स्थानिकांनी त्याचवेळी प्रशासनाला दिली होती. मात्र त्याच्या म्हणण्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. परंतु हा पुल आता वाहून गेल्यानं पाणी वाहून आणणाऱ्या महिलांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं गोदावरी नदीसह इतर नद्यांनाही पूर आला असून या पूरात आदित्य ठाकरेंनी उभारलेला पुलही वाहून गेला आहे. त्यामुळं आता महिलांना पाणी आणण्यासाठी आणि ये जा करण्यासाठी पुल नसल्यानं लाकडी बल्ल्यांवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या