मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Iqbalsingh Chahal : राज्यातील सर्वच महापालिका आयुक्तांची चौकशी करा; इक्बालसिंह चहल यांची मागणी

Iqbalsingh Chahal : राज्यातील सर्वच महापालिका आयुक्तांची चौकशी करा; इक्बालसिंह चहल यांची मागणी

Jan 16, 2023, 02:23 PM IST

    • Iqbalsingh Chahal ED inquiry : कोरोनाकाळात बीएमसीत घोटाळ्यांच्या आरोपाखाली ईडीनं आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता चहल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर मोठी मागणी केली आहे.
Iqbalsingh Chahal ED inquiry (HT)

Iqbalsingh Chahal ED inquiry : कोरोनाकाळात बीएमसीत घोटाळ्यांच्या आरोपाखाली ईडीनं आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता चहल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर मोठी मागणी केली आहे.

    • Iqbalsingh Chahal ED inquiry : कोरोनाकाळात बीएमसीत घोटाळ्यांच्या आरोपाखाली ईडीनं आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता चहल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर मोठी मागणी केली आहे.

Iqbalsingh Chahal ED inquiry : कोरोना महामारीच्या काळात मुंबई महापालिकेनं घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्यासाठी ईडीनं आयुक्त इक्बालसिंह चहल यांना काही दिवसांपूर्वी नोटीस जारी केली होती. त्यानंतर आज इक्बालसिंह चहल हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आलं आहे. परंतु चहल यांची चौकशी होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांसमोर राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता चहल यांच्या मागणीमुळं शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आयुक्त इक्बालसिंह चहल हे अनेक फाईली घेऊन ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यापूर्वी पालिकेतील काही अतिरिक्त आयुक्तांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत चर्चा केली आहे. त्यानंतर आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी फक्त मुंबई महापालिकाच नाही तर राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. बीएमसीतील घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी ईडीकडून सध्या त्यांची चौकशी केली जात आहे.

कोरोना महामारीच्या काळात मुंबई महापालिकेत आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत घोटाळ्यांचे आरोप केले होते. कोविड केयर सेंटरच्या उभारणीच्या कामात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर सोमय्या यांनी या प्रकरणातील कागदपत्रं ईडी अधिकाऱ्यांकडे सोपवली होती. त्यानंतर आता ईडीनं या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

पालिकेनं तातडीनं निर्णय घेतले नाहीतर....

कोरोना महामारीच्या काळात मुंबई महानगरपालिकेनं तातडीनं अनेक निर्णय घेतले, त्यावेळी प्रशासनानं परिस्थितीनुसार निर्णय घेतल्यामुळंच कोरोनाची स्थिती शहरात हाताबाहेर गेली नाही. नाही तर उत्तर प्रदेशच्या गंगेप्रमाणे मुंबईतील मिठी नदीतही लोकांची प्रेतं तरंगताना दिसली असती, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

पुढील बातम्या