मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shubhangi Patil: नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट; मविआ पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल

Shubhangi Patil: नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट; मविआ पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 16, 2023 01:49 PM IST

shubhangi patil not reachable : काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी करत नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर महाविकास आघाडीनं शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला होता.

shubhangi patil vs satyajeet tambe
shubhangi patil vs satyajeet tambe (HT)

shubhangi patil vs satyajeet tambe : सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर नाशिक पदवीधर निवडणुकीच्या काँग्रेसची नाचक्की झाली आहे. त्यानंतर आता काँग्रेसनं आमदार सुधीर तांबे यांचं निलंबन केलं असून नाशिकची जागा शिवसेनेला सोडली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीकडून पाठिंबा देण्याची घोषणा करत सत्यजीत तांबे यांना जोरदार धोबीपछाड दिला होता. त्यानंतर आता मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पदवीधर निवडणुकीसाठी गिरीष महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. त्यानंतर आता शुभांगी पाटील या सकाळपासून कुणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर आल्यानंतर निवडणुकीत नेमकं काय होणार, याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरेंनी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. परंतु नाशिकला परल्यापासून शुभांगी पाटील यांचा फोन बंद असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांचा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपनं मंत्री गिरीष महाजन यांना नाशिकमध्ये पाठवलं होतं. सत्यजित तांबे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्यामुळं महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point