मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गजानन महाराजांच्या भक्तांसाठी खुशखबर! मुंबई व पुण्याहून शेगावसाठी लवकरच धावणार ‘वंदे भारत’ ट्रेन

गजानन महाराजांच्या भक्तांसाठी खुशखबर! मुंबई व पुण्याहून शेगावसाठी लवकरच धावणार ‘वंदे भारत’ ट्रेन

Feb 09, 2024, 04:09 PM IST

  • Shegaon Vande Bharat : शेगावच्या गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच मुंबई व पुण्यावरून शेगावसाठी दोन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. मध्य रेल्वेकडून अशी माहिती देण्यात आली आहे.

pune to shegaon vande bharat train

Shegaon Vande Bharat : शेगावच्या गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच मुंबई व पुण्यावरून शेगावसाठी दोन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. मध्य रेल्वेकडून अशी माहिती देण्यात आली आहे.

  • Shegaon Vande Bharat : शेगावच्या गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच मुंबई व पुण्यावरून शेगावसाठी दोन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. मध्य रेल्वेकडून अशी माहिती देण्यात आली आहे.

देशात एकापाठोपाठ एक वंदे भारत ट्रेन लाँच केल्या जात आहेत. सध्या विविध मार्गावर ८२ वंदे भारत ट्रेन धावत आहेत. यात दिवसेंदिवस भर पडत आहेत. आता गजानन महाराजांच्या भक्तांसाठी भारतीय रेल्वेने खुशखबर दिली आहे. मुंबई व पुण्याहून तीर्थक्षेत्र शेगावचा प्रवास सुखकर आणि जलद होणार आहे. लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव मार्गावर दोन वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

या दोन मार्गावर वंदे भारत सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेकडून प्रस्ताव मागवण्यात आला आहे.  विदर्भातील पंढरी म्हणून श्रीक्षेत्र शेगावची ओळख आहे. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या चरणांचं दर्शन घेत असतात. मात्र शेगावला जाण्यासाठी रेल्वेसह अन्य वाहनांच्या अभावामुळे प्रवास करताना भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. 

मुंबई व पुण्यावरून शेगावला वंदे भारत सुरू करण्याची मागणी होत होती. ही बाब लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने शेगावसाठी दोन वंदे भारत टेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार,  मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगावसाठी वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत.

रेल्वेकडून सांगण्यात आले की, मे २०२४ पर्यंत देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ३० ते ३५ वंदे भारत एक्सप्रेस लाँच केल्या जाणार आहेत. यामध्ये गजानन महाराज यांचे श्रीक्षेत्र शेगावचा देखील समावेश करण्यात आला आहे. 

पुणे व मुंबईहून शेगावकडे धावणाऱ्या रेल्वे मार्गावर जळगाव व भुसावळ ही महत्त्वाची जंक्शन स्थानके आहेत. या स्थानकांवरुनही शेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या स्थानकांवर ‘वंदे भारत ट्रेन’ला थांबा मिळू शकतो.

पुढील बातम्या