मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Aug 09, 2023, 08:49 AM IST

    • Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain Update (HT)

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    • Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळं शहरी भागांतील नागरिकांना दिलासा मिळालेला असला तरी बळीराजाच्या अडचणी वाढताना दिसत आहे. परंतु आता महाराष्ट्राच्या हवामानात बदल होत असून चौहीकडे मान्सून सक्रीय होत असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान खात्याकडून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं आता बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यातून मान्सून गायब झाला आहे. त्यानंतर आता कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

पुढील एक ते दोन दिवसांत कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तसेच विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती व नागपूर या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचं आयएमडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार असून मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यम पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातील हवामानाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळं आता शेतकऱ्यांकडून किमान आठवडाभर जोरदार पावसाची अपेक्षा करण्यात येत आहे.

पुढील बातम्या