मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Breaking News Live Updates 9 August 2023 Get Latest News Live Blogn

Live News Updates (HT)

Live News Updates 9 August 2023: बच्चू कडू भविष्यात महाविकास आघाडीसोबत येतील, विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

Marathi Latest news : बच्चू कडू यांचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यांना सत्य कळले आहे. त्यामुळे बच्चू कडू भविष्यात महाविकास आघाडीसोबत येतील, असा दावा विजय वडेट्टीवर यांनी केला आहे.

Wed, 09 Aug 202302:37 PM IST

बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत येतील, विजय वडेट्टीवारांचा दावा

बच्चू कडू यांचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यांना सत्य कळले आहे. त्यामुळे बच्चू कडू भविष्यात महाविकास आघाडीसोबत येतील, असा दावा विजय वडेट्टीवर यांनी केला आहे.

Wed, 09 Aug 202305:17 AM IST

Hari Narke Death : ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

Hari Narke Passes Away : ज्येष्ठ लेखक, विचारवंत व महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचं मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. 

Wed, 09 Aug 202305:07 AM IST

PM Modi: महाराष्ट्रातील युती ठाकरेंनीच तोडली, भाजपनं नाही'; पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. राज्यातील युती ही ठाकरे यांनीच तोडल्याचं मोठ वक्तव्य मोदी यांनी केलं.

Wed, 09 Aug 202304:21 AM IST

Palghar News : धक्कादायक! सर्पदंश झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी रुग्णालयात अघोरी विद्येचा वापर

Palghar News : राज्याच्या आर्थिक राजधानी जवळ असलेल्या पालघर येथे आजही अंधश्रद्धेचा मोठा पगडा पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सर्पदंश झालेल्या एका व्यक्तीवर अंधश्रद्धेतून चक्क रुग्णालयातच अघोरी विद्या करण्यात आली असून यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर झाली.

Wed, 09 Aug 202301:45 AM IST

Pune: लोकसहभागातून 'मेरी माटी मेरा देश' उपक्रम उत्साहात राबविणार अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेऊन 'मेरी माटी मेरा देश' उपक्रम उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 'मेरी माटी मेरा देश' उपक्रम ९ ते १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत राबविले जाणार आहे.

Wed, 09 Aug 202301:44 AM IST

Amravati : अमरावतीत बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली आंदोलन

बच्चू कडू शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज "जन एल्गार मोर्चा" काढणार आहेत. संत गाडगेबाबा समाधी मंदिर ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा निघणार आहे.

Wed, 09 Aug 202301:44 AM IST

Nagpur: विरोधी पक्षनेते पद स्विकारल्यानंतर वडेट्टीवार मतदारसंघात

विजय वडेट्टीवार यांनी पक्षनेते पद स्वकारल्यानंतर पहिल्यांदा नागपुरात दाखल होणार आहेत. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.

Wed, 09 Aug 202301:43 AM IST

Sangli news : सांगलीत बीआरएस पक्षाचा मेळावा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत राष्ट्र समितीचा शेतकरी आणि सन्मान मेळावा सांगलीत पार पडणार आहे.  

Wed, 09 Aug 202301:43 AM IST

Gnyanwyapi : ज्ञानव्यापी सर्वेक्षणाला सुरुवात

ज्ञानवापीवरील सर्वेक्षण आज सकाळपासून सुरुवात होणार आहे. एएसआयच्या पथकाने मंगळवारी शृंगार गौरी गेट येथे सर्वेक्षण केले असून आज पुन्हा एएसआयच्या पथकाकडून हे सर्वेक्षण होणार आहे.

Wed, 09 Aug 202301:42 AM IST

Rahul gandhi : राहुल गांधी हे राजस्थानमधील मानगडच्या दौऱ्यावर

राहुल गांधी हे राजस्थानमधील मानगडच्या दौऱ्यावर असणार आहेत. तसेच आदिवासी दिनी काँग्रेसकडून निवडणुकांचं बिगुल देखील वाजणार आहे. यावेळी राहुल गांधी हे सभेला संबोधित करणार असून खासदारकी मिळल्यानंतरची राहुल गांधी यांची ही पहिली जाहीर सभा असणार आहे.

Wed, 09 Aug 202301:41 AM IST

manipur violence : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार

मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधककांडून केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. यावरुन मंगळवारी संसदेत गदारोळ झाला. आजही लोकसभेत चर्चा होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्मृती इराणी तसेच निर्मला सीतारामन लोकसभेत सरकारच्यावतीने भाषण करतील. तर, विरोधकांकडून राहुल गांधी बोलण्याची शक्यता आहे.

Wed, 09 Aug 202312:36 AM IST

 Parliament Monsoon Session :  मोदी सरकारविरोधातील संसदेत आज अविश्वास प्रस्ताव

 Parliament Monsoon Session : मणीपुर हिंसचारवरून संसदेत मोठा गदारोळ सुरू आहे. विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्थाव आणला असून या वर आज कारवाई होणार आहे. दरम्यान, विरोधक सरकारला अडचणीत आणणार का ? या कडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.