मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC Exam paper Leak : परभणीत बारावीचा सायन्सचा पेपर फुटला; प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

HSC Exam paper Leak : परभणीत बारावीचा सायन्सचा पेपर फुटला; प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

Mar 06, 2024, 04:36 PM IST

  • HSC Board Paper Leak : परभणीतून बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. आजच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

परभणीत बारावीचा  सायन्सचा पेपर फुटला

HSC Board Paper Leak : परभणीतून बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे.आजच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

  • HSC Board Paper Leak : परभणीतून बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. आजच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार ताजा असताना आता बारावी परीक्षेचा फुटल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या महिन्यात २१ फेब्रिवारीपासून राज्यात बारावी बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यंदा हजारो विद्यार्थी बारावी बोर्ड परीक्षा देत असून आतापर्यंत परीक्षेसंदर्भात कोणतीच तक्रार आली नव्हती. मात्र आता परभणीतून बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. आजच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या घटनेने परीक्षा केंद्रात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

काही दिवसांपूर्वी राज्यातील वनविभागासह अन्य काही स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याच्या तक्रारी आल्या होत्या. स्पर्धा परीक्षेचे पेपर लीक झाल्याने उमेदवारांना पुन्हा पेपर द्यावे लागत होते. आता असाच प्रकार बारावीच्या बोर्डाच्या पेपरमध्येही झाला आहे. परभणीत बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

पेपर फुटी व कॉफीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी परीक्षा बोर्डाने प्रचंड खबरदारी घेतली होती. मात्र आज बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार घडला आहे. बारावीचा बायोलॉजी विषयाचा पेपर परभणी जिल्ह्यामध्ये बायोलॉजी पेपरचे प्रश्नपत्रिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आढळून आले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली प्रश्नपत्रिका बारावीच्या बोर्ड परीक्षेचाच पेपर असल्याचा दावा केला जात आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या