HSC, SSC Exam : केंद्रांवर उशिरा याल तर परीक्षेला मुकाल ! दहावी बारावी परीक्षेबाबत बोर्डाचा मोठा निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC, SSC Exam : केंद्रांवर उशिरा याल तर परीक्षेला मुकाल ! दहावी बारावी परीक्षेबाबत बोर्डाचा मोठा निर्णय

HSC, SSC Exam : केंद्रांवर उशिरा याल तर परीक्षेला मुकाल ! दहावी बारावी परीक्षेबाबत बोर्डाचा मोठा निर्णय

Feb 02, 2023 12:18 PM IST

SSC-HSC Exam: १० आणि १२ वीच्या परीक्षा या २१ फेब्रुवारी टे २५ मार्चच्या दरम्यान आहे. परीक्षा केंद्रांवर जर आता येण्यास उशीर झाला तर थेट परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. तसे परिपत्रक बोर्डाने काढले आहे. त्यामुळे वेळेच्या आधी सेंटरवर येणे विद्यार्थ्यांना क्रमप्राप्त आहे.

HSC, SSC Exam
HSC, SSC Exam (HT)

पुणे : दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. २१ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान या परीक्षा आहेत. या परीक्षेसाठी ११ ते ३ वेळ नियोजित आहे. परीक्षा केंद्रांवर १० मिनिटे उशीर झाला तर तो ग्राह्य धरला जात होता. मुलांना परीक्षा देण्यास परवानगी देण्यात येत होती. मात्र, आता जर उशीर झाला तर केंद्रात प्रवेश न देण्याचे आदेश राज्य मंडळाने दिले आहेत. त्यामुळे वेळेच्या आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. उशीर झाल्यास त्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे.

राज्य परीक्षा मंडळाने या संदर्भात सर्व शाळांना लेखी सूचना दिल्या आहेत. शाळांनी देखील या संदर्भात विद्यार्थ्यांना सूचना देण्यास सुरुवात केली आहे. काही विद्यार्थी हे जाणून बुजून परीक्षा केंद्रांवर उशिरा आले होते. त्यांचा मोबाइलमध्ये पेपर संबंधी काही गोष्टी आढळल्या होत्या. यांची गंभीर दखल घेत कारवाई करण्यात आली होती. 

मात्र, भविष्यात असले प्रकार टाळण्यासाठी आता बोर्डाने कठोर पावले उचलले आहे. त्यामुळे या संबंधी सर्व शाळांना बोर्डाने पत्रक जारी केले आहे. त्यामुळे यापुढे सर्व विद्यार्थ्यंना परीक्षा केंद्रांवर वेळेच्या आधी हजर राहणे अनिवार्य आहे. या वर्षी पासून होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वर्षी वर्गात बैठे पथक शाळेत पूर्ण वेळ हजर राहणार आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर