मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मनसेच्या भूमिकेमुळं हिंदूंचं जास्त नुकसान; काँग्रेसनं आकडेवारीच दिली!

मनसेच्या भूमिकेमुळं हिंदूंचं जास्त नुकसान; काँग्रेसनं आकडेवारीच दिली!

May 05, 2022, 10:43 AM IST

    • मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेनं घेतलेल्या भूमिकेमुळं हिंदूंचं जास्त नुकसान झाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे.
राज ठाकरे (HT_PRINT)

मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेनं घेतलेल्या भूमिकेमुळं हिंदूंचं जास्त नुकसान झाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे.

    • मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेनं घेतलेल्या भूमिकेमुळं हिंदूंचं जास्त नुकसान झाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे.

'मनसेच्या भोंगाविरोधी आंदोलनामुळं (Loudspeaker Row) शिर्डी, त्र्यंबकेश्वरसह अनेक मोठ्या देवस्थानांमध्ये होणाऱ्या काकड आरत्या बंद झाल्या आहेत. मनसेच्या (MNS) या भूमिकेमुळं सर्वाधिक नुकसान हिंदूंचं झालं आहे,' अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले गेले पाहिजेत, अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. त्या नियमाची अंमलबजावणी अनेक मंदिरांनाही करावी लागत आहे. त्याचा फटका मंदिरातील पूजाअर्चा व आरत्यांना बसला आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी मनसेला लक्ष्य केलं आहे. सचिन सावंत यांनी एकामागोमाग एक ट्वीट केले आहेत.

‘मुंबई पोलीस अॅक्ट ३८(१) अन्वये मुंबईत पोलीस लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देतात. यात किती व केवढा वेळ वापरण्‍याचा नियम नाही. सर्वोच्च न्यायालयानं रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत मर्यादा घालून डेसिबलवर नियंत्रण ठेवलं. याव्यतिरिक्त कोणतंही बंधन नाही. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले वा रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणी वापर केला तर तक्रार करता येते. पहाटेची अजान स्वतः मुस्लिम समाजानं बंद केली आहे. पण आता काकड आरतीही बंद झाली, याकडं त्यांनी लक्ष वेधलं आहे.

'मनसेमुळं हिंदूचं अधिक नुकसान कसं झालंय हे सांगताना सचिन सावंत यांनी आकडेवारीच दिली आहे. ‘मुंबईत एकूण २४०४ मंदिरे व ११४४ मस्जिद आहेत. कालपर्यंत केवळ २० मंदिराकडं परवानगी आहे. तर ९२२ मस्जिदींकडं परवानगी आहे. ५ मंदिरांचे व १५ मस्जिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. मनसेचं ऐकलं तर २४०० मंदिरं, तसंच चर्च, गुरुद्वारा, बौद्ध मंदिरांना भोंगे वापरता येणार नाहीत. सार्वजनिक उत्सवांना परवानगी मिळणार नाही,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.

'पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेला निकराचा विरोध केला आहे. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली. हे पाप कोणाचं? मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे. भाजपशासित राज्यांनी बंदी का घातली नाही? याचं कारण स्पष्ट आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या