मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain : पुण्यात होळी उत्सवावर पावसाने घातले विरजण, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा

Pune Rain : पुण्यात होळी उत्सवावर पावसाने घातले विरजण, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा

Mar 06, 2023, 08:36 PM IST

    • Pune Rain : पुण्यात होळीउत्सव सुरू असतांना अचानक पावसाने हजेरी लावण्याने पुणेकरांची त्रेधा उडाली. होळीचा पावसापासून बचाव करण्यासाठी लोखंडी पत्राने अनेक ठिकाणी झाकण्यात आल्या.
Pune Rain

Pune Rain : पुण्यात होळीउत्सव सुरू असतांना अचानक पावसाने हजेरी लावण्याने पुणेकरांची त्रेधा उडाली. होळीचा पावसापासून बचाव करण्यासाठी लोखंडी पत्राने अनेक ठिकाणी झाकण्यात आल्या.

    • Pune Rain : पुण्यात होळीउत्सव सुरू असतांना अचानक पावसाने हजेरी लावण्याने पुणेकरांची त्रेधा उडाली. होळीचा पावसापासून बचाव करण्यासाठी लोखंडी पत्राने अनेक ठिकाणी झाकण्यात आल्या.

पुणे : पुण्यात होळीची धामधूम सरू असतांना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांचणी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पेटवलेल्या होळीला झाकण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली. शहरातील मध्यवर्ती भागात तुरळक पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vidhan parishad Election : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या, कारण काय?

Jayant Patil : अजित पवार आणखी ५ ते ६ दिवस थांबले असते तर त्यांची ती इच्छा पूर्ण झाली असती!, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

Ghatkopar Hoarding case : घाटकोपरमध्ये १४ जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ होर्डिंगची थेट ‘लिम्का बुक’ मध्ये आहे नोंद!

Narendra Modi : जिरेटोप घातला आता मोदींना सिंहासनावरही बसवणार का? प्रफुल्ल पटेलांवर टीकेची झोड

नवी पेठ, गरवारे महाविद्यालय, कोथरूड, दांडेकर पूल, धानोरी, सदाशिव पेठ, टिळक रोड भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. तर डेक्कन, घोले रोड परिसरात विजांच्या कडकडटासह पाऊस सुरु झाला आहे. हवामान विभागाने पुण्यात पावसाचा इशारा दिला होता. पुढील काही दिवस पुण्यात ढगाळ हवामान असून आज संध्याकाळी अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

या पावसामुळे होळीच्या उत्सवावर विरजण घातले. काही नागरिक हे होलिका दहणाच्या तयारीत होते. तर काही नागरिकांनी होळीचे दहन केले होते. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. तसेक पाण्यापासून होळीचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी लोखंडी पत्राने होळीचे संरक्षण केले. पुण्यात पुढील दोन दिवस ढगाळ हवामान राहणार असून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या