मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dahi Handi 2022 : दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी; २० वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Dahi Handi 2022 : दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी; २० वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Oct 08, 2022, 02:35 PM IST

    • Dahi Handi 2022 : दहीहंडी उत्सवात वरच्या थरावरील गोविंदा अंगावर पडल्यानं प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. गेल्या ४५ दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
govinda prathamesh sawant passed away (HT)

Dahi Handi 2022 : दहीहंडी उत्सवात वरच्या थरावरील गोविंदा अंगावर पडल्यानं प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. गेल्या ४५ दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

    • Dahi Handi 2022 : दहीहंडी उत्सवात वरच्या थरावरील गोविंदा अंगावर पडल्यानं प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. गेल्या ४५ दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

govinda prathamesh sawant passed away : काही दिवसांपूर्वीच दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. परंतु त्यावेळी दहीहंडी साजरी करत असताना वरच्या थरावरील गोविंदा अंगावर पडल्यानं गंभीर जखमी झालेला साईभक्त क्रीडा मंडळाचा गोविंदा प्रथमेशचा आज मृत्यू झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. याआधी दहीहंडीवेळी २४ वर्षीय गोविंदा संदेश दळवीचाही मृत्यू झाला होता. त्यामुळं आता प्रथमेशच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai News : मुंबईकरांचे हृदय नाजुक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्चरक्कदाबाचा आजार; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

दहीहंडी फोडताना वरच्या थरातील गोविंदा अंगावर पडल्यानं प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या कमरेखालील भागात संवेदनाच जाणवत नसल्यानं त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ४५ दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.

प्रथमेश डिलिव्हरी बॉयचं काम करायचा...

आयटीआयचा विद्यार्थी असलेल्या प्रथमेशच्या आईवडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालेलं होतं. उदरनिर्वाह करण्यासाठी तो डिलिव्हरी बॉयचं काम करत होता. आईवडिलांचं छत्र हरपल्यानं मावशी वैशाली सावंतनं प्रथमेशचा संभाळ केला होता.

नेमकं काय झालं होतं?

मुंबईतील घाटकोपरमध्ये साईभक्त क्रीडा मंडळाकडून प्रथमेशनं दहीहंडीत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यानं सुरक्षेसाठी हेल्मेट किंवा सुरक्षारक्षक काहीही घातलेलं नव्हतं. परंतु दहीहंडीचा पिरॅमिड कोसळल्यानं अनेकजण प्रथमेशच्या अंगावर कोसळले. परिणामी प्रथमेशच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला. त्यामुळं त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. काही दिवस तो अतिदक्षता विभागात होता. परंतु ४५ दिवस उपचार केल्यानंतरही त्याचा मृत्यू झाला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या