मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Govinda Death: मुंबईतील एका गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू; भाजप-सेनेत आरोप-प्रत्यारोप

Govinda Death: मुंबईतील एका गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू; भाजप-सेनेत आरोप-प्रत्यारोप

Aug 23, 2022, 10:03 AM IST

    • Death of Govinda Sandesh Dalvi in Mumbai: दहीहंडीवेळी जखमी झालेल्या गोविंदाच्या मृत्यूवरून आता राजकारण सुरू झालं आहे. शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी गोविंदाचा मृत्यू दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
मुंबईत दहीहंडीवेळी जखमी गोविंदाचा उपचारावेळी मृत्यू (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Death of Govinda Sandesh Dalvi in Mumbai: दहीहंडीवेळी जखमी झालेल्या गोविंदाच्या मृत्यूवरून आता राजकारण सुरू झालं आहे. शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी गोविंदाचा मृत्यू दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

    • Death of Govinda Sandesh Dalvi in Mumbai: दहीहंडीवेळी जखमी झालेल्या गोविंदाच्या मृत्यूवरून आता राजकारण सुरू झालं आहे. शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी गोविंदाचा मृत्यू दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

Govinda Death in Mumbai: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दहीहंडीचा उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय दहीहंडीचा उत्सव झाला. दरम्यान, या उत्सवाला आता एका गोविंदाच्या मृत्यूमुळे गालबोट लागलं आहे. मुंबईत दहीहंडीवेळी सातव्या थरावरून पडल्याने जखमी झालेल्या संदेश साळवी या गोविंदाचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. दोन दिवस त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या प्रकरणी शनिवारीच आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विलेपार्ले पूर्व बाबरवाडा विमानतळ येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. विलेपार्ले पूर्व इथं वाल्मिकी चौकात रियाज शेख यांच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी पथकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली नव्हती. तसंच कोणतीही सुरक्षेची साधने पुरवण्यात आली नव्हती. त्यामुळे दहीहंडीवेळी दोन गोविंदा जखमी झाले होते. यामत विनय शशिकांत राबाडे आणि संदेश प्रकाश दळवी यांचा समावेश होता. दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.

गोविंदाच्या मृत्यूनंतर राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी कुटुंबीयांना १० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं की, दहीहंडीवेळी सातव्या थरावरून तो खाली कोसळल्याने मानेला आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा सोमवारी दुपारी निधन झाले. गोविंदाचा मृत्यू दुर्दैवी आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार गोविंदाच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्यात येतील. तसंच त्याला आणखी काही मदत करता येईल का हे पाहू असंही महाजन यांनी म्हटलं. आयोजकांकडून नियमांचे पालन करण्यात आले नव्हते याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, "आयोजकांनी नियमांचे पालन केले की नाही याची चौकशी केली जाईल."

दरम्यान, गोविंदाच्या मृत्यूवरून आता राजकारण सुरू झालं आहे. शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी गोविंदाचा मृत्यू दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. "गोविंदांसाठी रुग्णावाहिकेची सोय नव्हती. मंडळाच्या लोकांनी जखमी गोविंदांना रुग्णालयात दाखल केलं. थरांची मर्यादासुद्धा पाळली गेली नाही."असंही ते म्हणाले. गोविंदाच्या मृत्यूनंतर शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपावर प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गोविंदाच्या मृत्यूचं राजकारण करू नये. संवेदनशील सरकारने गोविंदांना १० लाखांचा विमा पहिल्यांदा दिला. सरकार सर्व मदत देणार आहे. गोविंदाच्या मृत्यूचं भांडवल म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाताय का? असा सवाल दरेकरांनी विचारला. तसंच ठाकरे साहेबांची शिवसेना हे चुकीचं करत असल्याचं म्हणत शिवसेनेवर त्यांनी टीका केली.

पुढील बातम्या