मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain Alert : बाप्पाच्या विसर्जनात वरुणाराजा घालणार धिंगाणा; पुढील २ ते ३ तासात तुफान पावसाचा अलर्ट

Mumbai Rain Alert : बाप्पाच्या विसर्जनात वरुणाराजा घालणार धिंगाणा; पुढील २ ते ३ तासात तुफान पावसाचा अलर्ट

Sep 28, 2023, 05:50 PM IST

  • Mumbai Rain Alert : मुंबई सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होऊन सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीतीही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

Ganesh visarjan

Mumbai Rain Alert : मुंबई सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होऊनसखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीतीही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

  • Mumbai Rain Alert : मुंबई सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होऊन सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीतीही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

मुंबई - राज्यभरातील गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले असताना मुंबई, पुणे व कोल्हापुरात दुपारच्या वेळी पावसाने हजेरी लावली. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २ ते ३ तासात मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बाप्पांच्या विसर्जनावेळी वरुणराजाही कडाडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुढचे दोन ते तीन तास तुफान पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या


राज्यभरात ढोल-ताशांच्या गजरात व डॉल्बीच्या दणदणाटात गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व शहरातील रस्ते गर्दीच्या ओसंडून वाहत आहेत. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गणेश भक्तांच्या अंदाजावर थोडं विरजण पडलं आहे.

मुंबई सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होऊन सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीतीही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बुधवारी संध्याकाळीही मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. तर गुरूवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट आणि सिंधुदुर्गामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुपारी मुंबईतील दादर, सायन, गोरेगाव व अंधेरीत विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

पूर्वेकडून गडगडाटी वादळे मुंबईच्या दिशेने येत असून येत्या दोन-तीन तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह, जोरदार वाऱ्यांसहमध्यम तेमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहनही हवामान खात्याने केलं आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटी वादळांसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या