मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ५ किडन्या विकणे आहेत; सरकारी कार्यालयासमोर लागले अजब बॅनर

५ किडन्या विकणे आहेत; सरकारी कार्यालयासमोर लागले अजब बॅनर

Oct 13, 2023, 06:28 PM IST

  • Illegal Moneylenders : सावकाराच्या जाचाला कंटाळून एका महिलेने कुटूंबासह गेल्या दोन वर्षापासून घर सोडले. आता त्याने किडन्या विकणार असल्याचे बॅनर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावलेले बॅनर

Illegal Moneylenders : सावकाराच्या जाचाला कंटाळून एका महिलेने कुटूंबासह गेल्या दोन वर्षापासून घर सोडले. आता त्याने किडन्या विकणार असल्याचे बॅनर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावले आहेत.

  • Illegal Moneylenders : सावकाराच्या जाचाला कंटाळून एका महिलेने कुटूंबासह गेल्या दोन वर्षापासून घर सोडले. आता त्याने किडन्या विकणार असल्याचे बॅनर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावले आहेत.

नांदेडमध्ये सध्या एका विचित्र बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सावकारी कर्ज फेडण्यासाठी एका महिलेनं चक्क पाच किडनी विकणे आहे, असं पोस्टर लावलं आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच भिंतीवर हे पोस्टर लावण्यात आलं आहे. खासगी सावकाराच्या दहशतीने या महिलेनं आपल्या कुटुंबियासह गेल्या दोन वर्षांपासून घर सोडलं आहे. तेव्हापासून हे कूटूंब वणवण भटकत आहे. त्यांनी लावलेलं पोस्टर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असून चर्चेता विषय ठरलं आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai News : मुंबईकरांचे हृदय नाजुक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्चरक्कदाबाचा आजार; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

सावकारी कर्जाचा फाश एखाद्याला आयुष्यातून कसा उठवतो व कर्जदारांना कोणत्या अडचणींना सामना करावा लागतो, या प्रत्यंतर या बॅनरकडे पाहून येते. 

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वाईवरदड गावातील सत्यभामा कुंचलवार या महिलेने हे पोस्टर लावलेत. त्यांच्या कुटुंबात पती, दोन मुले आणि एक मुलगी असे  पाच सदस्य आहेत. मागील तीन वर्षापूर्वी त्यांनी मुदखेडच्या खासगी सावकाराकडून दोन लाख रूपये कर्ज घेतलं होते. त्यानंतर काही पैसे फेडलेही होते. मात्र नंतर कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यानं सर्वकाही ठप्प झालं. त्यातच शेतीतूनही फारसे उत्पन्न मिळत नव्हतं. एकीकडे उत्पन्नाचा मार्ग नाही व दुसरीकडे वाढत जाणारा कर्जाचा डोंगर अशा विचित्र आर्थिक कोंडीत हे कुटूंब सापडलं होते. यामुळे कर्जाची परतफेड त्या करू शकल्या नाहीत.

हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे. सावकारी जाचाची प्रकरणे राज्यातील गावागावात आजही सुरुच आहेत. मात्र एखाद्याला सावकारी जाचामुळे आपली किडनी विकावी लागत असेल तर याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर अशा खासगी सावकारांवर वचक बसणार कसा, हा प्रश्नच आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या