मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udyog Award: पहिला महाराष्ट्र उद्योग पुरस्कार रतन टाटा यांना, तर उद्योगमित्र अदर पूनावालांना जाहीर

Udyog Award: पहिला महाराष्ट्र उद्योग पुरस्कार रतन टाटा यांना, तर उद्योगमित्र अदर पूनावालांना जाहीर

Aug 18, 2023, 11:27 PM IST

  • Maharashtra udyog award : महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षी पासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना जाहीर झाला आहे.

ratan tata and adar poonawalla

Maharashtraudyogaward : महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षी पासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना जाहीर झाला आहे.

  • Maharashtra udyog award : महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षी पासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना जाहीर झाला आहे.

Maharashtra Udyog Award : यंदाचे उद्योग पुरस्कार जाहीर झाले असून पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना तर उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना, तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

पुरस्कार प्रदान सोहळा २० ऑगस्टला दुपारी २ वाजता वांद्रे -कुर्ला संकुलमधील जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,   उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असेल. मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा उपस्थित राहणार आहेत.

पुरस्काराचे स्वरुप

‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या