मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jaipur Express Firing : मोठी बातमी ! पालघर येथे जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF हवालदारचा गोळीबार; चार प्रवसी ठार

Jaipur Express Firing : मोठी बातमी ! पालघर येथे जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF हवालदारचा गोळीबार; चार प्रवसी ठार

Jul 31, 2023, 09:22 AM IST

    • Jaipur Express Firing : पालघर येथे एका आरपीएफ हवालदाराने जयपूर एक्सप्रेसमध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास गोळीबार केला असून यात चार जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
Jaipur Express Firing

Jaipur Express Firing : पालघर येथे एका आरपीएफ हवालदाराने जयपूर एक्सप्रेसमध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास गोळीबार केला असून यात चार जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

    • Jaipur Express Firing : पालघर येथे एका आरपीएफ हवालदाराने जयपूर एक्सप्रेसमध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास गोळीबार केला असून यात चार जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

पालघर : पालघर येथे जयपूर एक्सप्रमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी पहाटे ५ च्या सुमारास घडली. आरपीएफ हवलदाराचा प्रवाशांशी वाद झाल्याने त्याने रागाच्या भरात गोळीबार केला. या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. हल्लेखोर जवानाला अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Weather Forecast: पावसाचा जोर ओसरला तरी 'या; जिल्ह्यात दमदार बरसणार; वाचा हवामानाचा अंदाज

आरपीएफ हवालदार चेतन सिंह, असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार जयपूर एक्सप्रेसच्या बी-५ या बोगीमध्ये घडला. दरम्यान, ही एक्सप्रेस ट्रेन मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मृतांमध्ये आरपीएफच्या अधिकारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे.

Live News Updates 31 July 2023 : ITR भरण्यासाठी आज शेवटचा दिवस, सहा कोटी लोकांनी भरले विवरण

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी राजस्थान येथून जयपूर एक्सप्रेस निघाली होती. या गाडीने आज सकाळी गुजरात सोडून महाराष्ट्रात प्रवेश केला. दरम्यान, आज सकाळी, पहाटे ५ वाजता ही गाडी पालघर जवळ येताच आरपीएफ जवान चेतन सिंह याचा काही प्रवाशांसोबत वाद झाला. त्याला प्रवासी आणि त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्याने समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा सहकारी असलेल्या दुसऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्याने तयाला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र, रागाच्या भरात त्याने त्याच्या जवळील बंदूक प्रवाशांवर ताणून गोळीबर केला.

यात सिंह याच्या सहकारी कर्मचाऱ्या सोबत ३ प्रवासी हे जागीच ठार झाले. तर काही प्रवासी हे गंभीर जखमी झाले. गोळीबाराच्या आवाजाने डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते. तर अनेक कर्मचारी हे दहशती खाली होते. हल्लेखोर सिंहला अटक करून बोरीवली येथे आणण्यात आले आहे. तर चौघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या