मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg accident : अमरावती येथे समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; चालकासह वाहक ठार

Samruddhi Mahamarg accident : अमरावती येथे समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; चालकासह वाहक ठार

Aug 16, 2023, 11:35 AM IST

  • Accident near Amaravati on Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अमरावती येथे तळेगाव दशासर येथे भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

     

Samruddhi Mahamarg accident

Accident near Amaravati on Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अमरावती येथे तळेगाव दशासर येथे भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

  • Accident near Amaravati on Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अमरावती येथे तळेगाव दशासर येथे भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

     

अमरावती : समृद्धी महामार्गावर आपघातांची मालिका ही सुरच आहे. अमरावती येथे तळेगाव दशासार येथे मध्यरात्री १ वाजता दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला. हा ट्रक नागपूर येथून मुंबईला जात होता. दरम्यान, चालकाला डुलकी लागण्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

sharad Ponkshe : ना गांधी, ना सावरकर, हे तर ओरिजिनल खान; अभिनेते शरद पोक्षेंची राहुल गांधीवर टीका

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका ही सरूच आहे. बुलढाणा येथील अपघातात तब्बल २५ जणांचा जळून मृत्यू झाला होता. यानंतर प्रशासनामार्फत या ठिकाणी अनेक उपाय योजना करण्यात आल्या. मात्र, असे असतांना देखील या मार्गावर अपघात सुरूच आहे. काल रात्री नागपूरहून मुंबईला सामान घेऊन एक ट्रक निघाला होता. दरम्यान, हा ट्रक अमरावती येथील तळेगाव दशासर येथे आला असता, ट्रकचालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा ट्रक पुढच्या ट्रकला जाऊन धडकला. यात ट्रक चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू झाला. त्या दोघांची नावे अद्याप समजू शकली नाही.

Earthquake : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा भूकंपाने हादरला; ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

या घटनेची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी दोघांना दवाखान्यात भरती केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाय केले आहेत. येथील वाहनाच्या टायरची तपासणी तसेच दारू पिणाऱ्यांची देखील तपासणी केली जात आहे. तसेच जागो जागी आराम करण्यासाठी देखील थांबे उभारण्यात आले आहे. असे असतांना देखील या मार्गावरील अपघात हे अद्याप थांबलेले नाहीत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या