मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आम्ही एकमेकांवर लाईन मारतोय, सध्या काहीही जमलेलं नाही; सेनेशी युतीनंतर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

आम्ही एकमेकांवर लाईन मारतोय, सध्या काहीही जमलेलं नाही; सेनेशी युतीनंतर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Jan 21, 2023, 09:38 PM IST

    • Prakash Ambedkar In Nashik : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी केली होती.
Prakash Ambedkar on VBA And Shiv Sena Aliance In BMC (HT)

Prakash Ambedkar In Nashik : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी केली होती.

    • Prakash Ambedkar In Nashik : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी केली होती.

Prakash Ambedkar on VBA And Shiv Sena Aliance In BMC : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नव्या वक्तव्यामुळं वंचित-शिवसेनेतील युतीतील गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. कारण आता शिवसेनेशी आमचं नातं अजून जुळलेलं नाही, आम्ही फक्त एकमेकांवर लाईन मारत असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अजून वंचित आणि शिवसेनेचं नातं जुळलेलं नाही. सध्या आम्ही फक्त एकमेकांवर लाईन मारतोय. नाशिक पदवीधर निवडणुकीत शिवसेनेनं आमचा पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळं वंचितचे नेते जुळलेले नाहीत. सध्या आम्ही एकमेकांना केवळ खाणाखुणा करत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. मुंबईच्या इंदु मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असून यापुढे त्यांनी स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी बोलावलं तर निश्चित जाईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळं आता वंचित आणि शिवसेनेच्या युतीबाबतचा संभ्रम वाढण्याची शक्यता आहे.

आम्हाला निवडणुकांत यश किंवा अपयश येत असलं तरी आमची लढाई ही नेहमीच धनशक्तीच्या विरोधात राहिलेली आहे. सध्या विधानपरिषदेसाठी अकोला, लातूर आणि नागपुरात वंचितसाठी पोषक वातावरण असून कोकणातही आम्हाला चांगलं यश मिळेल, असं म्हणत त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे.

पुढील बातम्या