मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Electricity Cut In Pune PCMC : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अचानक बत्ती गुल, वीजपुरवठा खंडित झाल्याने सामान्यांची दैना

Electricity Cut In Pune PCMC : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अचानक बत्ती गुल, वीजपुरवठा खंडित झाल्याने सामान्यांची दैना

May 19, 2023, 12:09 AM IST

    • Electricity Cut In Pune City : पुण्यासह पिंपरी आणि चिंचवडमधील वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Electricity Cut In Pimpari Chinchwad (HT)

Electricity Cut In Pune City : पुण्यासह पिंपरी आणि चिंचवडमधील वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    • Electricity Cut In Pune City : पुण्यासह पिंपरी आणि चिंचवडमधील वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Electricity Cut In Pimpari Chinchwad : शिक्रापूर ते तळेगाव दरम्यानच्या अतिउच्चदाबाच्या वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळं पुण्यासह पिंपरी आणि चिंचवडमधील वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दोन्ही लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर पुणे, पिंपरी, चिंचवड, चाकण एमआयडीसी, नगर रस्ता, भोसरी आणि वाघोलीतील लाखो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यानंतर आता महावितरणकडून वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते तळेगाव दरम्यानच्या चार वीजवाहिन्यांपैकी दोन वीज वाहिन्यांमध्ये अचानक बिघाड झाला आहे. त्यामुळं चाकण, चिंचवड, उर्से, खराडी आणि इतर सर्व उपकेंद्रांतील वीजपुरवठा बंद झाला. विजपुरवठा बंद झाल्यामुळे पुण्यातील खराडी, वाघोली, वडगाव शेरी, विमाननगर, धानोरी, विमानतळ परिसर आणि धानोरी परिसरातील वीजपुरवठा बंद झाला आहे. तसेच पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाल्हेकरवाडी, पुनावळे, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव, आकुर्डी आणि निगडीतील वीजपुरवठाही बंद झाला आहे. लाईट नसल्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनाफोनी करण्यास सुरुवात केली आहे.

शिक्रापूर ते तळेगाव दरम्यानच्या वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यानंतर महावितरणने चाकण येथील वीजवाहिनीद्वारे पुण्यासह पिंपरी आणि चिंचवड शहरात वीजपुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे. बिघाड झालेल्या वीज वाहिन्यांची दुरुस्ती करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्री अकरा ते साडेअकरा वाजेपर्यंत सर्व अतिउच्चदाब उपकेंद्रांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यानंतर आता शहरातील अन्य भागांमधील वीज पुन्हा येण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या