मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Accident : द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर भीषण अपघात; आयशरची कंटेनरला धडक, मायलेकींचा जागीच मृत्यू

Nashik Accident : द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर भीषण अपघात; आयशरची कंटेनरला धडक, मायलेकींचा जागीच मृत्यू

May 23, 2023, 01:40 PM IST

    • Nashik Accident : राज्यात आज सकाळ पासून अपघातांची मालिका सुरू आहे. बुलढाणा आणि अमरावती नंतर आता नाशिकच्या द्वारका- आडगाव उड्डाणपुलावर आयशर कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे.
Nashik Accident

Nashik Accident : राज्यात आज सकाळ पासून अपघातांची मालिका सुरू आहे. बुलढाणा आणि अमरावती नंतर आता नाशिकच्या द्वारका- आडगाव उड्डाणपुलावर आयशर कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे.

    • Nashik Accident : राज्यात आज सकाळ पासून अपघातांची मालिका सुरू आहे. बुलढाणा आणि अमरावती नंतर आता नाशिकच्या द्वारका- आडगाव उड्डाणपुलावर आयशर कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे.

नाशिक : राज्यात आज सकाळ पासून अपघातांची मालिका सुरू आहे. बुलढाणा आणि अमरावती नंतर आता नाशिकच्या द्वारका- आडगाव उड्डाणपुलावर आयशर कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी ७ च्या सुमारास झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

द्वारका ते आडगाव या उड्डाणपुलावर आयशर टेम्पो हा बंद अवस्थेत उभा होता. महामार्गावरून सकाळच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने या आयशरला टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी कंटेनर चालकाच्या शेजारी बसलेल्या आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. इगतपुरीहून धुळ्याच्या दिशेने हा कंटेनर निघाला होता आणि याचवेळी नाशिक शहरात प्रवेश करत असताना हा अपघात झाला.

नाशिकमध्ये अपघातांची मालिका सुरू आहे. आडगाव द्वारका उड्डाणपुलावर हा अपघात माय लेकीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचा तपास पंचवटी पोलिसांकडून करण्यात येत आहे. या उड्डाणपुलावर दुचाकीला देखील प्रवेश नाही, मात्र उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत असतात.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या